त्या घोषणा मी ऐकल्याच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:23 AM2021-08-18T04:23:55+5:302021-08-18T04:23:55+5:30
नांदेड- जन आशीर्वाद यात्रेदरम्यान परळी येथे कोणत्याही घोषणा झाल्या नाहीत, मी अशा कोणत्याही घोषणा ऐकल्या नाही, असे म्हणत केंद्रीय ...
नांदेड- जन आशीर्वाद यात्रेदरम्यान परळी येथे कोणत्याही घोषणा झाल्या नाहीत, मी अशा कोणत्याही घोषणा ऐकल्या नाही, असे म्हणत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी त्या घटनेवर पांघरूण घातले.
कराड हे मंगळवारी नांदेडमध्ये आले होते. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला सोमवारी परळी येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. भागवत कराड यांच्या उपस्थितीत मुंडे समर्थकांनी ‘पंकजा ताई अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. या प्रकाराबद्दल कराड यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी असा काही प्रकार झाला नसल्याचे सांगितले, तसेच मी कोणत्याही घोषणा ऐकल्याच नाहीत. पंकजा ताई आमच्या नेत्या आहेत असे म्हणून त्यांनी झालेल्या प्रकारावर पांघरूण घातले.