'मलाही पवारांप्रमाणे वजन घटवायचंय, दगदग खूप आहे, तरी प्रकृतीची काळजी घ्यावीच लागेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 08:22 PM2019-02-04T20:22:29+5:302019-02-04T20:23:04+5:30
रोग्य आणि फिटनेसबाबत प्रश्न विचारला असता, मलाही शरद पवारांप्रमाणे वजन घटवायचं असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
राजा माने
मुंबई - महाआघाडी ही मूलभूत विचारसरणीच्या आधारावरच उभी राहिली आहे. महाआघाडीच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आघाडीत घ्या, असे कुणी म्हटले तर ते शक्य आहे काय, असा सवाल करीत राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत घेण्यास माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट विरोध केला आहे. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच आरोग्य आणि फिटनेसबाबत प्रश्न विचारला असता, मलाही शरद पवारांप्रमाणे वजन घटवायचं असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकमता दिलेल्या मुलाखतीत मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावेळी, नुकतेच शरद पवार यांनी 14 किलो वजन कमी केले आहे, त्यांनी नॉनव्हेजही सोडले. मग, तुमचा तसा काही मानस आहे का ? असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना बोलताना मला दगदग खूप आहे, मला प्रवास खूप आहे, जबाबदारी जास्त आहे. भेटणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे, ताण प्रचंड आहे. या सर्व बाबींचा प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे मलाही आरोग्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. मलाही पवारसाहेबांप्रमाणे वजन घटवायची इच्छा आहे. आयपीएल मॅचप्रमाणे कमी वेळेत जास्त धावा काढायच्या, तसंच माझं काम आहे. वेळ कमी असून कामाचा व्याप जास्त आहे. तरीही, प्रकृतीची काळजी घ्यावीच लागणार आहे, असे चव्हाण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. दरम्यान, राज्यात काँग्रेसला पोषक वातावरण असून मी राज्यभर दौरा केला. त्यामध्ये लोकांचा कल जाणून घेतल्याचेही ते म्हणाले.
राज्यात काँग्रेस आणि आघाडीला पोषक वातावरण आहे. मी गेल्या सहा महिन्यांमध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यात फिरलोय, जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून मी कोकणातही फिरलोय. त्यामध्ये काँग्रेसला लोकांचा पाठींबा मिळत असल्याचं चित्र आहे. तसेच राज्यात आघाडी व्हावी, अशीही लोकांची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.