डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला जागा देण्यासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:17 AM2019-04-12T00:17:52+5:302019-04-12T00:21:39+5:30

नांदेड रेल्वेस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र अभिवादनासाठी या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने शेजारील विक्रीकर कार्यालय इतरत्र हलवून डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यालयाची जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीसह सम्यक आंदोलनच्या शिष्टमंडळाने गुरुवारी खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली.

i will Follow-up for the place for Dr. Babasaheb Ambedkar memorial | डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला जागा देण्यासाठी पाठपुरावा करणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला जागा देण्यासाठी पाठपुरावा करणार

Next
ठळक मुद्देअशोकराव चव्हाण यांचा शब्द स्मारक समितीसह सम्यकच्या शिष्टमंडळाची भेट

नांदेड : नांदेड रेल्वेस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र अभिवादनासाठी या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने शेजारील विक्रीकर कार्यालय इतरत्र हलवून डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यालयाची जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीसह सम्यक आंदोलनच्या शिष्टमंडळाने गुरुवारी खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित जागेसाठी पाठपुरावा करण्याची तसेच आगामी काळात काँग्रेसची सत्ता आल्यास सदर जागा स्मारकासाठी देण्याचा शब्द खा. चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिला.
रेल्वेस्थानकासमोर महानगरपालिकेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. मात्र पुतळा परिसरातील जागा अपुरी पडत आहे. विशेषत: अभिवादनासाठी अनुयायांनी गर्दी केल्यानंतर त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच स्मारक समितीचे अध्यक्ष रमेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली रमेश सोनाळे, एन. डी. गवळे, कोंडदेव हटकर, अ‍ॅड. जयप्रकाश गायकवाड, राजेश गोडबोले यांच्यासह सम्यक आंदोलनचे अध्यक्ष प्रफुल्ल सावंत आणि सत्यशोधक विचारमंचचे कोंडदेव हाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चव्हाण यांना निवेदन देवून पुतळ्याशेजारील विक्रीकर कार्यालयाची इमारत स्मारकासाठी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री असताना या मागणीला आपण स्वीकृती दिली होती ही बाबही या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावर तेथील परिस्थिती पाहता आपली मागणी रास्त असल्याचे सांगत सदर जागा स्मारकासाठी मिळावी म्हणून पाठपुरावा करील. याबरोबरच येणा-या काळात राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास याबाबतचा निर्णय तातडीने घेऊन स्मारकासाठी जागा देवू, असा शब्द खा. चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिला. यावेळी समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: i will Follow-up for the place for Dr. Babasaheb Ambedkar memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.