माझी बदनामी नको असेल तर लीड द्या, मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिले : अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 05:51 AM2024-04-19T05:51:39+5:302024-04-19T05:52:08+5:30
येहळेगाव हे माझ्या कारखान्याच्या हद्दीतील गाव असून, येथून लीड देण्याची तुमची जबाबदारी आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
नांदेड : आज देशात मोदींची हवा असून, विकसित भारतासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिली आहे. तुम्ही सर्वांनी मिळून गावागावात लीड दिलीच पाहिजे. येहळेगाव हे माझ्या कारखान्याच्या हद्दीतील गाव असून, येथून लीड देण्याची तुमची जबाबदारी आहे. वरिष्ठ नेत्यांकडे माझी बदनामी होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर मताधिक्य द्या, अशी भावनिक साद माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घातली.
आरक्षणाचा प्रश्न भाजपच सोडवेल...
मराठा आरक्षण चळवळीमुळे समाजाची एकजूट झाली आहे. या चळवळीला काही लोक बदनाम करू पाहत आहेत. राजकारण अन् समाजकारण वेगवेगळ्या बाजू असून, आपण कोणत्याही पक्षाच्या बाजूने नसल्याने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काही गावात जाणीवपूर्वक नेत्यांना विरोध करून मराठा आरक्षण चळवळ बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. त्याला मराठा युवकांनी बळी पडू नये, असे आवाहनही अशोकराव चव्हाण यांनी केले.