. नांदेड शहरातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:15 AM2017-12-14T01:15:09+5:302017-12-14T01:15:19+5:30

नांदेड: शहरातील बोटावर मोजण्याएवढ्या शाळांनाही अग्निशमन यंत्रणेचे कवच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ एखादी आगीची घटना घडल्यानंतर प्राथमिक सुविधा पुरविण्यासही शाळा प्रशासन सज्ज नाही़

. Ignore the safety of the students of Nanded city schools | . नांदेड शहरातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

. नांदेड शहरातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देसंस्थाकडे अग्निशमन यंत्रणेचे कवच नाही : शहरातील अवघ्या चार शाळांनी घेतले नाहरकत प्रमाणपत्र



शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहरातील बोटावर मोजण्याएवढ्या शाळांनाही अग्निशमन यंत्रणेचे कवच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ एखादी आगीची घटना घडल्यानंतर प्राथमिक सुविधा पुरविण्यासही शाळा प्रशासन सज्ज नाही़ अग्निशमन विभागाकडून शहरातील शेकडो शाळांपैकी केवळ चार शाळांनी अग्निशमन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेतले आहे़ त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो़
शहरात गेल्या चार दिवसांत विविध ठिकाणी आगीच्या चार घटना घडल्या आहेत़ कोणती घटना कधी घडेल याचा नेम नसतो, परंतु एखादी घटना घडल्यानंतर विशिष्ट गोष्टीची तपासणी करण्याची पद्धत प्रशासनाकडून अवलंबिली जाते़ अनधिकृत बांधकामे, रस्त्यावरील खड्डे यामुळे दुर्देवी घटना घडल्यानंतर प्रशासन त्यादृष्टीने पावले उचलून कारवाई करते़ परंतु देशाचे भविष्य असलेल्या लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत मात्र पालक आणि शाळाप्रशासन दोघेही बेफिकीर असल्याचेच पहावयास मिळते़ अग्निशमन यंत्रणेबाबत शाळा व्यवस्थापनास आस्थाच नाही़ शहरात महापालिकेच्या १४, मोठ्या इंग्रजी शाळा २७, मध्यम विद्यार्थी संख्या असलेल्या शंभराहून अधिक त्याचबरोबर जिल्हा परिषद व मराठी माध्यमाच्या शाळांची संख्याही शेकडोंच्या घरात आहे़ परंतु अग्निशमन विभागाकडून त्यातील केवळ चार ते पाच शाळांनी नाहरकत प्रमाणपत्र घेतले आहे़ इतर शाळांना त्याची गरज वाटली नाही अन् अग्निशमन विभागानेही त्यासाठी विशेष पाठपुरावा केला नाही़ परंतु आता अग्निशमन विभागाने शहरातील काही शाळांना त्याबाबत नोटीस पाठविली आहे़ वेळप्रसंगी अग्निशमन विभागाला या शाळांना टाळे ठोकण्याचेही अधिकार आहेत़ विशेष म्हणजे, या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात़ त्यांचा जाण्या-येण्याचा मार्ग अरुंद असतो़ घटना घडल्यास पर्यायी मार्गही अनेक शाळांमध्ये नाहीत़ या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे़ हजारो रुपये प्रवेश शुल्क आकारणाºया या शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मात्र एवढ्या गाफील कशा? असा प्रश्नही या निमित्ताने समोर येतो़
नाहरकत प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष- महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सरंक्षण अधिनियम २००६ अन्वये प्रत्येक शाळा, महाविद्यालयांना अग्निशमन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे़ शाळांचा आराखडा तयार झाल्यानंतर संबंधित आर्किटेक्चर अग्निशमन यंत्रणेकडून तशी प्राथमिक परवानगी घेतो़ मात्र काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेचे अंतिम नाहरकत प्रमाणपत्रच घेण्यात येत नाही़ इमारतीत अग्निशमन यंत्रणा आहे किंवा नाही़, याची माहिती अग्निशमन विभागाकडेही नसते़


कोणतीही इमारत १५ ते २४ मीटर उंचीदरम्यान असल्यास त्याला उच्च दाबाचे दोन पंप, सायरन, स्प्रिंकलर, अंतर्गत आणि बाह्य पाण्याची पाईपलाईन उभारणे आवश्यक असते़ या इमारतीवर डाऊनकमर पद्धतीने वरुन खाली

पाणी येण्यासाठी खास १० हजार लिटरची पाण्याची टाकी राखीव असावी़ ती टाकी वर्षभर भरुन राहण्याची काळजी घेणे गरजेचे आहे़ तसेच २४ मीटरपेक्षा उंच इमारतीवर आणि भूमिगतदेखील पाण्याची टाकी असावी़ साधारणत: १५ मीटर उंचीच्या इमारतीत चार मजले येतात़ नांदेडात एवढ्या उंचीच्या इमारती नसल्या तरी, अग्निशमनची कोणतीही व्यवस्था शाळांमध्ये नसल्याचेच दिसून आले़ १५ मीटर खालील इमारतीमध्ये फायर इस्टीग्यूशर बसविणे गरजेचे असते़ ते देखील आठ ते दहा मीटरवर एक याप्रमाणे असावे़


अशी असावी
अग्निशमन यंत्रणा
अशी असावी
अग्निशमन यंत्रणा

Web Title: . Ignore the safety of the students of Nanded city schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.