अवैध दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:12+5:302021-01-08T04:54:12+5:30
थेरबनला चोरी भोकर - भोकर तालुक्यातील थेरबन येथे चोरी झाली. चोरट्यांनी ५७ हजार रुपये लंपास केले. थेरबन येथील विठ्ठल ...
थेरबनला चोरी
भोकर - भोकर तालुक्यातील थेरबन येथे चोरी झाली. चोरट्यांनी ५७ हजार रुपये लंपास केले. थेरबन येथील विठ्ठल नलबे व त्यांचे सहकारी गावातील महादेव मंदिरातील कार्यक्रमासाठी गेले होते. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घर फोडले. भोकर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून तपास जमादार जाधव करीत आहेत.
सावित्रीबाई फुले जयंती
भोकर - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सायाळ ता.भोकर येथील अंगणवाडीत साजरी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका वनिता पांचाळ, द्वारकाबाई फुगले, भारतबाई फुगले, सुमनबाई, चंद्रकला गव्हाळे, अंजना वाघमारे, शीतल वाघमारे, पूजा वाघमारे, सुनील वाघमारे आदी उपस्थित होते.
मोटरसायकल रॅली
देगलूर - देगलूर येथील महिलांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीला प्राचार्य दिगंबर शहापुरे यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी शाळेच्या वतीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ.एकलारे मॅडम, शेखापुरे मॅडम, कच्छवे मॅडम, गंगासागर मॅडम, तोरणे मॅडम, दंतुलवार मॅडम आदी उपस्थित होते.
सुरवसे सेवानिवृत्त
किनवट - येथील सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व इतिहास विभागप्रमुख अंकुशराव सुरवसे सेवानिवृत्त झाले. संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार, प्राचार्य डॉ.आनंद भंडारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. किरण पाईकराव, मुकुंद तिरमनवार, सुनील पाठक, डॉ. सुनील व्यवहारे, प्रा.तपनकुमार मिश्रा, डॉ. रामकिशन चाटे, व्यंकट सातूरवार, गणेश बिंगेवार, ॲड. दासरवार उपस्थित होते.
शांतता समितीची बैठक
हणेगाव - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हणेगाव येथील पोलीस चौकीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली . यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, मरखेलचे सपोनि आदित्य लोणीकर, देगलूरचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, अजित बिरादार, पोलीस जमादार कनकवले, पोलीस नाईक पांढरे, जोगपेठे, चांबलवार आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले जयंती
उमरी - संत दासगणू महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा उमरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला माध्यमिक शाळेचे पी.व्ही. जाधव, प्राथमिकचे पी.एम.राठोड, एन.एल.बेल्लुरे, आर.एन.मनूरकर, एस.के.भूजबळे, पी.एम. बैनवाड, पी.बी. गोडगे, पवार आदी उपस्थित होते.
माझी वसुंधराची शपथ
नायगाव - माझी वसुंधरा अभियानांतर्गत तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, नागरिकांच्या उपस्थितीत माझी वसुंधराची शपथ घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, मुख्याधिकारी नंदकिशेार भोसीकर, कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव, रामेश्वर बापुले, श्रीधर कोलमवार आदी उपस्थित होते.