पैनगंगा नदीतून अवैध वाळू उपसा जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:15+5:302021-02-09T04:20:15+5:30
किनवट तालुक्यात पैनगंगा नदीवर येंदा पेंदा, परोटी, मारेगाव (खा), भुलजा, सिंदगी (मो), रामपूर, खंबाळा, मोहपूर, पांधरा, भंडारवाड, खेर्डा, मलकापूर, ...
किनवट तालुक्यात पैनगंगा नदीवर येंदा पेंदा, परोटी, मारेगाव (खा), भुलजा, सिंदगी (मो), रामपूर, खंबाळा, मोहपूर, पांधरा, भंडारवाड, खेर्डा, मलकापूर, चिखली खु., कोठारी (चि), प्रधानसांगवी आदी १४ वाळू घाट असून, एकाही घाटाचा लिलाव झालेला नाही. वाळू माफिया रात्री-बेरात्री तराफे लावून उपसा करीत आहेत. उपसलेल्या वाळूचा ढीग मारून बैलगाडी, ऑटो, ट्रॅक्टरने वाळूची वाहतूक केली जाते. याबाबत अखिल भारतीय कैकाडी महासंघाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन वाळू उपसा बंद करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर आनंद माने, संदीप जाधव, विनोद माने, अमोल जाधव, शत्रुघ्न केंद्रे आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी द्रोण कॅमे-याच्या साहाय्याने वाळू उपशावर नजर ठेवली जाईल, असे सांगितले होते, मात्र तसे काहीही घडत नसल्याने वाळू उपसा वाढला आहे. नदी, नाल्याकाठच्या शेतीत उपसा केलेली वाळू साठा करून ठेवली जात आहे.