नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपशाने नदीपात्र रुंदावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:33 AM2020-12-16T04:33:33+5:302020-12-16T04:33:33+5:30
हा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मोहीम हाती घेतली आहे. बिहारी टोळ्याविरुद्ध कारवाई केली जात ...
हा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मोहीम हाती घेतली आहे. बिहारी टोळ्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. ही कारवाई अशीच सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोट ......................
जिल्ह्यात सर्रासपणे वाळूचा उपसा सुरू आहे. अनियंत्रितपणे सुरू असलेल्या वाळू उपशाने पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे.नांदेड शहरासह उमरी, मुदखेड, नायगाव, लोहा या भागात नदीपात्राची रुंदी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुराचा फटका बसत आहे. त्याचवेळी धर्माबाद, उमरी, नायगाव या तालुक्यातील पाणी पातळीही दिवसेंदिवस खालावत आहे. यावर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे.
प्रा. बालाजी कोंपलवार
पर्यावरण तज्ज्ञ
उमरी, नायगाव या भागात सुरू असलेल्या वाळू उपशाने शेतीचे मोठे नुकसान होत आहे.नदीकाठच्या शेतीत आता पिकांऐवजी वाळूचे साठे दिसत आहेत. हे साठे पकडल्यानंतर कारवाई वाळू माफियांवर न होता शेतकऱ्यांवरच केली जात आहे. शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर बोजा टाकला जात आहे.
साईनाथ राजूरवार, नायगाव