किनवटमध्ये चार फर्निचर मार्टवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:31 AM2018-07-16T00:31:40+5:302018-07-16T00:32:12+5:30

शहरातील रामनगर भागात चार फर्निचर मार्टवर वन विभागाच्या गस्तीपथकाने छापे मारून विनापासचे सुमारे १ लाख ५६ हजार ७३० रुपये ुुकिमतीच्या मौल्यवान सागवानाची कटसाईज लाकडे जप्त केली़ बेकायदा असलेल्या रंदा मशीनसह या कारवाईत १ लाख ८६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ १४ जुलै रोजी केलेल्या कारवाईत १५ जुलै रोजी जप्त मालाची मोजदाद संपली़

Impressions on Four Furniture Mart | किनवटमध्ये चार फर्निचर मार्टवर छापे

किनवटमध्ये चार फर्निचर मार्टवर छापे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील रामनगर भागात चार फर्निचर मार्टवर वन विभागाच्या गस्तीपथकाने छापे मारून विनापासचे सुमारे १ लाख ५६ हजार ७३० रुपये ुुकिमतीच्या मौल्यवान सागवानाची कटसाईज लाकडे जप्त केली़ बेकायदा असलेल्या रंदा मशीनसह या कारवाईत १ लाख ८६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ १४ जुलै रोजी केलेल्या कारवाईत १५ जुलै रोजी जप्त मालाची मोजदाद संपली़
बहुचर्चित सागवान फर्निचर जप्ती प्रकरणी फर्निचर तस्करीचे बिंग फोडणाऱ्या वाहनचालक व रंगीला फर्निचर मार्ट गोकुंदाचे चालक अशा दोघांना वन विभागाने संशयित आरोपी म्हणून अटक करून न्यायालयासमोर उभे केले़ फर्निचर जप्त करून १९ दिवसांचा कालावधी उलटत असतानाही फर्निचर तस्करीचा मुख्य सूत्रधार, जेथे माल जाणार होता, तो व्यक्ती, हा माल पोहोचविण्यासाठी ज्यांनी जबाबदारी घेतली ते अद्यापही मोकाटच आहेत़
बहुचर्चित सागवान फर्निचर जप्ती प्रकरण ताजे असतानाच शहरातील रामनगर भागातील चार वेगवेगळ्या फर्निचर मार्टवर १४ जुलै रोजी दिवसभर एकाच वेळी वन विभागाच्या पथकाने छापे मारून सुमारे १ लाख ५६ हजार ७३० रुपये किमतीचे कटसाईज सागवान व ३० हजार रुपये किमतीची एक रंदा मशीन असा १ लाख ८६ हजार ७३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे १५ जुलै रोजी मोजदादनंतर उघड झाले़
गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरुन, नांदेडचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटचे सहा़ वनसंरक्षक डॉ़राजेंद्र नाळे, वनक्षेत्रपाल के़एऩ कंधारे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल शेळके, वनपाल के़जी़ गायकवाड, शेख फरीद, घोरबांड, सांगळे, वनरक्षक काजी, ठवरे, फोले, खामकर, चुकलवार, कºहाळे, यादव, महिला वनरक्षक मीरा टोंपे, माहुरे, सोनू जाधव, कोमल मºहसकोल्हे, वाहनचालक बी़टी़ भूतनार, बाळकृष्ण आवळे, अनिल लाचाडे, बी़टी़ जाधव, वनमजूर भावसिंग, सातव, रफीक, शेख रसुल्ला आदींनी ही कारवाई केली़
लाखोंची उलाढाल
४महिन्याकाठी किनवटमधून अडीचशे पास दिले जातात़ एका पासचे शुल्क शंभर रुपये आहे़ परंतु प्रत्यक्षात अनधिकृतपणे होणारी सागवानाची तस्करी ही लाखोंच्या घरात जाते़ एकट्या किनवट शहरात ३५ फर्निचर मार्ट असून दररोज जवळपास १५ ते २० लाखांची उलाढाल या माध्यमातून होते़

Web Title: Impressions on Four Furniture Mart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.