खाली पोलिस, शेडवर कॉप्या पुरविणारे तरुण; नांदेडमध्ये दहावीच्या परीक्षेत कॉपीमुक्तीचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:07 IST2025-03-01T16:06:59+5:302025-03-01T16:07:49+5:30
दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला सर्रास पुरवल्या कॉप्या; नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील घटना

खाली पोलिस, शेडवर कॉप्या पुरविणारे तरुण; नांदेडमध्ये दहावीच्या परीक्षेत कॉपीमुक्तीचा फज्जा
नांदेड: जिल्ह्यात दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला कॉपीमुक्ती अभियानाचा फज्जा उडल्याचे दिसून आले. नायगाव येथील जनता विद्यालयात अनेक तरुण परीक्षा केंद्रात कॉपी पुरवत होते. केंद्राच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या शेडवर चढून परीक्षा हॉलमध्ये हे तरुण कॉपी पुरवत होते.
दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला सर्रास पुरवल्या कॉप्या; नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील घटना#nanded#marathwada#sscexampic.twitter.com/aJRTw4l3rU
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 1, 2025
प्रशासनाने दहावी - बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र, जिल्ह्यात कॉपीमुक्ती अभियानाचा फज्जा उडाला आहे. आज दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. जिल्ह्यातील नायगाव येथील जनता हायस्कूलमध्ये सर्रास कॉपी सुरू होती. पेपर सूरू असताना दुकानाच्या शेडवर चढून काही तरुण विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत होते. विशेष म्हणजे, येथे पोलीस कर्मचारी उपस्थित होता. पोलिसा समोरच हा प्रकार सूरू होता.