ठाकरे गटात गोंधळ; नांदेडमध्ये जिल्हाप्रमुख अन उपतालुका प्रमुखात फ्री स्टाईल हाणामारी

By शिवराज बिचेवार | Published: June 29, 2023 05:29 PM2023-06-29T17:29:12+5:302023-06-29T17:30:26+5:30

विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून आले.

In Nanded Thackeray group's district chief and sub-taluka chief clash | ठाकरे गटात गोंधळ; नांदेडमध्ये जिल्हाप्रमुख अन उपतालुका प्रमुखात फ्री स्टाईल हाणामारी

ठाकरे गटात गोंधळ; नांदेडमध्ये जिल्हाप्रमुख अन उपतालुका प्रमुखात फ्री स्टाईल हाणामारी

googlenewsNext

नांदेड- विधान परिषदेचे विराेधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या दौऱ्यानिमित्त तयारीसाठी गुरुवारी शासकीय विश्रामगृहात संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाप्रमुख बबन बारसे आणि मुदखेड उपतालुकाप्रमुख गुलाब देशमुख यांच्यात शाब्दीत चकमक उडाल्यानंतर दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यानंतर हा वाद शिवाजीनगर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून आले.

विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे शुक्रवारी हिंगोली आणि नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. सायंकाळी जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. त्याच्या दौऱ्याच्या तयारीसाठी गुरुवारी शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संपर्क प्रमुख बबन थोरात हे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची स्तुती करीत होत. त्याचवेळी मुदखेड उपतालुकाप्रमुख गुलाब देशमुख हे उठले, आम्हाला दोन मिनिटे बोलू द्या, असे म्हणून त्यांनी थोरात यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी थाेरात यांनी देशमुख यांना खाली बसविले, अन् पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.

परंतू परत एकदा देशमुख उठले आणि त्यांनी थोरात यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त झालेल्या थोरात यांनी देशमुख यांना बाहेर निघून जा असे सांगितले. त्यावर देशमुख यांनी आम्हाला गेट आऊट म्हता का? असा सवाल केला. तोच जिल्हाप्रमुख बबन बारसे हे रागाने देशमुख यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणमारी झाली. त्यानंतर देशमुख यांनी तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्ती करुन त्यांची समजूत घातली. एकूणच या प्रकारामुळे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

Read in English

Web Title: In Nanded Thackeray group's district chief and sub-taluka chief clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.