नांदेडमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सभामंडपाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:10 PM2019-01-14T17:10:26+5:302019-01-14T17:12:49+5:30
महाविहार बावरीनगर येथे २० आणि २१ जानेवारी रोजी ३२ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे़
नांदेड : नांदेडमध्ये बावरीनगर दाभड येथे होणाऱ्या ३२ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सभा मंडपाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी व धम्म परिषदेच्या आयोजनासाठी प्रशासन संपूर्ण सहकार्य करेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केले़
महाविहार बावरीनगर येथे २० आणि २१ जानेवारी रोजी ३२ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे़ या धम्म परिषदेसाठी देश-विदेशातील भिक्खूंची उपस्थिती असते़ तसेच राज्यभरातून उपासकांची येथे हजेरी लागते़ तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असणाऱ्या महाविहार परिसरात होणाऱ्या या धम्म परिषदेला प्रशासनाच्या वतीने रस्ते व सुरक्षा यासह अन्य मुलभूत सुविधा जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत़ हे तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठीही विकासकामे सुरू आहेत़ त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले.
या परिषदेच्या सभामंडपाच्या भूमीपूजन कार्यक्रमास भदंत धम्मसेवक महाथेरो, भदंत उपगुप्त महाथेरो, भिक्खू पय्याबोधी, भिक्खू पय्यारत्न, भिक्खू संघपाल, भिक्खू सुभूती, परिषदेचे संयोजक डॉ़एस़पीग़ायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती़ सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ़मिलिंद भालेराव यांनी केले़ यावेळी अशोक नवसागरे, यशवंत गच्चे, नागनाथ रावणगावकर, बी़एम़ वाघमारे, अशोक गोडबोले, डी़डी़भालेराव, संजय लोणे, शोभाबाई रावणगावकर, कमलताई गायकवाड, संजय खिल्लारे, सुमेध गायकवाड, डॉ़राजपाल चिखलीकर, लक्ष्मण गरजे, उद्धव सरोदे आदींची उपस्थिती होती.