लसीकरणाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:59+5:302021-03-23T04:18:59+5:30
जिल्हाधिकारी यांना निवेदन नांदेड, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोहा शाखेकडून पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आपण ...
जिल्हाधिकारी यांना निवेदन
नांदेड, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोहा शाखेकडून पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आपण आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी लोहा तालुक्यातील दापशेड येथील शेतकरी गंगाधर सोनकांबळे यांनी दिले आहे. मागील चार महिन्यांपासून बँकेत खेटे मारत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निबंध स्पर्धेचे आयोजन
नांदेड, श्री गुरू तेग बहादर साहिब यांच्या ४०० वर्षे प्रकाश पर्वनिमित्त सचखंड बोर्डाच्यावतीने गुरू तेग बहादर - हिंद की चादर या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. हिंदी, मराठी, पंजाबी, इंग्रजी भाषेत किमान २०० शब्दांत निबंध पाठविणे आवश्यक आहे. इच्छुकांनी ५ एप्रिलपर्यंत निबंधाची प्रत मुख्याध्यापक, खालसा हायस्कूल दशमेशनगर येथे सादर करावी, असे आवाहन गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने करण्यात आले आहे.
देशमुख यांना पीएच.डी.
नांदेड, इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको येथील ग्रंथपाल प्रा. शिवराज बाबाराव देशमुख यांना स्वारातीम विद्यापीठाने ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान केली आहे. प्रा. देशमुख यांनी ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला होता. यशाचे संस्थाध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिव डी. पी. सावंत, प्राचार्य माळी, आदींनी स्वागत केले.