नांदेडमध्ये आयकर विभागाचे छापे; फायनान्स व्यापारी बंधूंच्या कार्यालय, निवासस्थानी कारवाई
By शिवराज बिचेवार | Published: May 10, 2024 11:36 AM2024-05-10T11:36:27+5:302024-05-10T11:36:43+5:30
तब्बल 25 गाड्यातून आलेल्या जवळपास साठहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांची संयुक्त कारवाई
नांदेड- नांदेड शहरात आज सकाळी आयकर विभागाने सहा ठिकाणी छापे टाकले. शहरातील संजय भंडारी या फायनान्स या व्यापाऱ्यासह त्यांच्या भावाच्या कार्यालय आणि निवासस्थानी झाडाझडती सुरू आहे.
शहरातील शिवाजीनगर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन कार्यालय, तसेच कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय, आदिनाथ पतसंस्था , आणि पारसनगर येथील संजय भंडारी आणि त्यांच्या भावाच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. आयकर विभागाच्या, पुणे , नाशिक , छ. संभाजीनगर , नागपुर , नांदेड , परभणी येथील पथकांनी एकाच वेळी ही कारवाई केली.
तब्बल 25 गाड्यातून आलेल्या जवळपास साठहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सूरु आहे .