म्यूकोरमायकोसिसचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:20+5:302021-05-09T04:18:20+5:30
काय घ्यावेत उपचार रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित करणे, अँटिफंगल इंजेक्शन देणे, नाक व सायनसमधील आजार काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करणे ...
काय घ्यावेत उपचार
रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित करणे, अँटिफंगल इंजेक्शन देणे, नाक व सायनसमधील आजार काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करणे गरजेचे आहे. कोविडची लागण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यामध्ये नाक नॉर्मल सलाईनने स्वच्छ करणे. रक्तातील साखरेचे प्रमाण पंधराव्या व बाविसाव्या दिवशी तपासून पाहणे, ज्या रुग्णांना कोविडच्या उपचारामध्ये तोसिलिझुमाब, रेडमेसिविर दिले आहे. तसेच ज्यांना पाच दिवसांपेक्षा अधिक दिवस ऑक्सिजन दिला आहे. तसेच स्टेरॉईड इंजेक्शन, गोळ्या दिल्या आहेत. ज्यांचे शुगर कंट्रोल नाही अशा सर्व रुग्णांनी नाकामध्ये बुरशीची लागण झाली आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता पंधराव्या व बाविसाव्या दिवशी स्वॅब तपासून घ्यावा. ज्या रुग्णांना या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळतात. त्यांनी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. या पद्धतीचा अवलंब केल्यास कोरोनाप्रमाणे या बुरशीजन्य आजारावरही मात करता येईल, असेही डॉ. गुजराथी म्हणाले.