कोरोना संसर्गामुळे गूळवेलीस वाढती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:01+5:302021-05-22T04:17:01+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढल्याने प्रत्येकजण कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. या काळात राेग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी गूळवेल ...

Increasing demand for corolla due to corona infection | कोरोना संसर्गामुळे गूळवेलीस वाढती मागणी

कोरोना संसर्गामुळे गूळवेलीस वाढती मागणी

Next

जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढल्याने प्रत्येकजण कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. या काळात राेग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी गूळवेल या वनस्पतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. गूळवेल ही वनस्पती रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे या वनस्पतीची मागणी चांगलीच वाढली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी गूळवेलचा काढा घेण्यास पसंदी दिली आहे. अनेक आजारावर ही वेल अमृतवेल ठरत असल्याचे जाणकार सांगत आहेत. गूळवेलचा काढा सेवन केल्याने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, मळमळ, मूळव्याध, सांधेदुखी, आम्लपित, पोटदुखी, मधुमेह इत्यादी आजार गुळवेलमुळे आटोक्यात येतात, असे सांगितले जाते. तसेच डेंग्यू, चिकनगुन्या, स्वाईन फ्ल्यू या आजारावर ही गूळवेल गुणकारी असल्यामुळे ग्रामीण भागासोबत आता शहरी भागातही गूळेवलला मागणी होत आहे. ग्रामीण भागात कडूनिंबाच्या झाडावर व आंब्याच्या झाडावर गूळवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. कडूनिंबाच्या झाडावरील गूळवेलला मोठी मागणी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून अनेक कुटुंब गूळवेल काढा सेवन करत आहेत. काही जण या वेलीचे छोटे छोटे तुकडे करून रात्री पाण्यात भीजत ठेवतात. सकाळी उपाशीपोटी या पाण्याचे सेवन करतात. तर काहीजण या वेलीचे तुकडे पाण्यात टाकुन ते पाणी उकळून पितात. गूळवेल हा एक रानभाजीचा प्रकारही मानला जातो.

चौकट- गूळवेल ही वनस्पती बहुगुणी आहे. गूळवेलमुळे ने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, मळमळ, मूळव्याध, सांधेदुखी, आम्लपित, पोटदुखी, मधुमेह, डेंग्यू, चिकनगुन्या, स्वाईन फ्ल्य आदी आजारावर नियंत्रण मिळविता येतात. मात्र आजारी व्यक्तीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी देणे गरजेचे आहे. - डॉ. सय्यद ताहेर, आयुर्वेद तज्ञ, नांदेड.

Web Title: Increasing demand for corolla due to corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.