स्वतंत्र मराठवाडा नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 04:43 PM2017-09-20T16:43:45+5:302017-09-20T16:46:10+5:30

स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणे ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचे सांगत अशा मागणीमागे कुठलाही आधार नाही़ त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या शक्तीला आमचा कायम विरोध राहील, असे स्पष्ट मत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले़

Independent Marathwada does not exist | स्वतंत्र मराठवाडा नकोच

स्वतंत्र मराठवाडा नकोच

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाडा जनता विकास परिषदेची वार्षिक बैठकअ‍ॅड़ प्रदीप देशमुख यांची मागणी चुकीची असून मराठवाडा जनता विकास परिषद अशा मागणीला कायम विरोध करील

नांदेड : स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणे ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचे सांगत अशा मागणीमागे कुठलाही आधार नाही़ त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या शक्तीला आमचा कायम विरोध राहील, असे स्पष्ट मत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले़
शाखेच्या नांदेड शहर वार्षिक बैठकीत स्वतंत्र मराठवाड्याचा मुद्दा उपस्थित झाला़ जनता विकास परिषदेच्याच अ‍ॅड़प्रदीप देशमुख यांनी मध्यंतरी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली होती़ पाच दशकांत मराठवाड्याचा विकास झाला नाही़ वैधानिक विकास मंडळाचा उपायही तकलाघू असल्याचे सांगत मराठवाड्याचे स्वतंत्र अस्तित्व अपरिहार्य असल्याचे मत अ‍ॅड़देशमुख यांनी नोंदविले होते़ अ‍ॅड़देशमुख यांची ही मागणी चुकीची असल्याचे सांगत मराठवाडा जनता विकास परिषद अशा मागणीला कायम विरोध करील, असे स्पष्टीकरण परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांनी दिले़ माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली़ आम्ही एकसंघ व एकात्म महाराष्ट्राशी बांधील असल्याचे सांगत, स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी जे धर्मनिरपेक्ष आणि समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठीच जनता विकास परिषदेने विविध आंदोलने केल्याचे सांगितले़
या बैठकीत परिषदेचे संचालक हर्षद शहा यांनी दिल्ली-मुंबई कॉरीडॉर जालना-नांदेडमार्गे झाला पाहिजे अशी मागणी केली़ उमाकांत जोशी यांनी मराठवाड्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयावर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी झेंडावंदन अनिवार्य करावे, असे मत नोंदविले़ या बैठकीला परिषदेचे माजी केंद्रीय कोषाध्यक्ष द़मा़रेड्डी, शहर शाखेचे सरचिटणीस प्रा़डॉ़विकास सुकाळे, कोषाध्यक्ष प्राचार्य गोपाळराव कदम आदींची उपस्थिती होती़ शेवटी प्रा़अशोक सिद्धेवाड यांनी आभार मानले़
रस्त्याच्या गुणवत्तेसाठी बजेटचे वॉर्डवाचन व्हावे
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या नांदेड शहर शाखेच्या बैठकीत विविध मुद्यांवर उपस्थितांनी मते मांडली़ प्रा़उत्तम सूर्यवंशी यांनी नांदेडच्या नियोजनबद्ध विकासासाठी महापालिका आयुक्तांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करू नये, अशी मागणी केली़ बांधकाम गुत्तेदारांकडून रस्त्याच्या गुणवत्तेसाठी बजेटचे वॉर्डवाचन करावे, याबरोबरच दलित वस्तीसाठी मनपाचा राखीव निधी वापरताना आयुक्तांनी निकषांच्या अंमलबजावणीसाठी समिती नियुक्त करावी, अशी मागणीही सूर्यवंशी यांनी यावेळी केली़  

 

Web Title: Independent Marathwada does not exist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.