जिल्ह्यात पुन्हा पाच कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:20 AM2021-09-18T04:20:00+5:302021-09-18T04:20:00+5:30

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे पाच तर अँटिजन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ९० ...

Infected five corona again in the district | जिल्ह्यात पुन्हा पाच कोरोना बाधित

जिल्ह्यात पुन्हा पाच कोरोना बाधित

Next

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे पाच तर अँटिजन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ९० हजार २८७ एवढी झाली असून, ८७ हजार ६०३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ३३ रुग्ण उपचार घेत असून ४ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरूक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेऊन मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करून अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६५१ एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा ५ असे एकूण ५ बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण ३ व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज ३३ कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ९, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण १४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण ६, खासगी रुग्णालय ४ व्यक्ती उपचार घेत आहेत. दरम्यान, पाचशे नागरिकांच्या तपासणीत पाच रुग्ण निघत आहेत. तर तपासण्या वाढविल्यास अधिक रुग्ण आढळून येतील, अशी भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Infected five corona again in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.