डांबर घोटाळ्यातील आरोपीचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:54 AM2018-10-07T00:54:38+5:302018-10-07T00:55:00+5:30
डांबर घोटाळ्यात सहा आरोपींवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून यातील दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे़ या प्रकरणात शुक्रवारी सोनाई कन्स्ट्रक्शनचे सतिष देशमुख यांनी जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे़ विशेष म्हणजे या प्रकरणात सतिष देशमुख यांचा या प्रकरणाशी संबध नसल्याचे पत्र फिर्यादीने पोलिसांना दिले होते़ त्यामुळे या प्रकरणातील फरार आरोपींचे आता धाबे दणाणले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : डांबर घोटाळ्यात सहा आरोपींवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून यातील दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे़ या प्रकरणात शुक्रवारी सोनाई कन्स्ट्रक्शनचे सतिष देशमुख यांनी जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे़ विशेष म्हणजे या प्रकरणात सतिष देशमुख यांचा या प्रकरणाशी संबध नसल्याचे पत्र फिर्यादीने पोलिसांना दिले होते़ त्यामुळे या प्रकरणातील फरार आरोपींचे आता धाबे दणाणले आहेत़
नांदेड बांधकाम परिमंडळात सहा कंत्राटदारांनी डांबर खरेदीच्या बनावट पावत्या दाखवून जवळपास १२ कोटींचा घोटाळा केला होता़ याप्रकरणी ६ कंत्राटदारांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली़ अन्य चौघांचा पोलीस शोध घेत आहेत़ दरम्यान, सोनाई कन्ट्रकन्शनने जोडलेल्या डांबर गेटपासच्या पावत्या खऱ्या फेरपडताळणी झाली होती़
त्यामुळे देशमुख यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन पत्र पोलिसांना दिले होते़ दरम्यान, फेरपडताळणीमुळे सतीश देशमुख यांना दिलासा मिळाला होता़ परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही़ शुक्रवारी न्यायालयात देशमुख यांनी जामीन अर्ज केला होता़
पाचवे जिल्हा न्या़तोडकर यांनी देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला़ या प्रकरणात सरकारच्या वतीने अॅड़नितीन कागणे यांनी बाजू मांडली़ दरम्यान, न्यायालयाच्या या दणक्यामुळे आता फरार असलेल्या इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत़