कंधार तालुक्यात ८५६ जलस्त्रोतांची अॅपद्वारे तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:28 AM2019-01-28T00:28:28+5:302019-01-28T00:29:07+5:30
मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाले आहे.
प्रा. डॉ. गंगाधर तोगरे।
कंधार : मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाले आहे. तर कंधार तालुक्याचे काम ९०.२० टक्के झाले आहे. संकलित पाणीनमुने तपासणीअंती पिण्यास योग्य की अयोग्य, याचे वास्तव उलगडणार आहे.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार जि. प. ही जिल्ह्याभर मोहीम राबवित आहे. कंधार तालुकास्तरावर ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या योजना व स्त्रोतांची रासायनिक तपासणीसाठी मोबाईल अॅपद्धारे पाणीनमुने गोळा करण्यात येत आहेत. १० आॅक्टो २०१८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत गावे, वाडी, तांडे आदी भागात जाऊन पाणीनमुने संकलित करण्यात आले. पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमात तालुक्याचे ९४९ चे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ८५६ साध्य झाले. शंभर टक्के दिलेले उद्दिष्ट साध्य केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात अवघे ९३ शिल्लक स्त्रोतांचे रासायनिक तपासणी नमुने घेऊन १०० टक्के साध्य केले जाणार आहे.
हा कार्यक्रम नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा यत्रंणेतील तांत्रिक दोष, पाणीस्त्रोत देखभाल व दुरूस्तीअभावी पाणी दूषित होते. पाण्याजवळील घाण यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असतो. अशामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पाणीनमुने तपासणी करून ते पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित केले जाते आणि शुद्ध पाणीपुरवठा केला केला जातो. पं. स. व तालुका आरोग्य विभागाने यासाठी समन्वयाने काम केले जात आहे. जिल्ह्यात ११ हजार २९० चे उद्दिष्ट होते. परंतु, ९ हजार २१९ फोटो अपलोड झाले. अर्धापूर १०० टक्के, उमरी १०० टक्के, तर कंधार ९० .२० टक्के उद्दिष्ट साध्य झाले. गटविकास अधिकारी कैलास बळवंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार अधिकारी अशोक सोनकांबळे, एस. एम. अली यांच्या सूचनेनुसार पाणी नमुने गोळा केले जात आहेत.
तालुक्यातील आलेगाव येथील १३ पाणीनमुने संकलित करण्यात आले. आंबुलगा १५, औराळ ६, बाबूळगाव ६, बाचोटी ९, बहाद्दरपुरा १२, बाळांतवाडी व बामणी प्रत्येकी ४, बारूळ १९, भेंडेवाडी ५, भंडारकुमठ्याची वाडी ७, भोजूची वाडी २, भूकमारी १, भुत्याची वाडी ५, बोळका ८, चिखलभोसी १०, चिखली ७, चिंचोली प.क.१२, दहीकंळबा ९, दाताळा ७, दिग्रस बु़ १४, दिग्रस खु़ १३, गौळ १७, घोडज ७, गोणार ५, गुलाबवाडी ६, गुंडा ८, गुंटूर १०, हाळदा १५, इमामवाडी ६, कळका ८, कल्हाळी ६, काटकंळबा १३, कौठा ४४, कोटबाजार ११, कुरूळा २२, लालवाडी व मादाळी प्रत्येकी ७, मानसपुरी ८, नागलगाव ८, नवघरवाडी ७, उस्माननगर १५, पानभोसी १६ ,पांगरा १४ ,पानशेवडी १०, पेठवडज १९, फुलवळ २४ , राऊतखेडा ८, रूई ९, संगमवाडी ७ , शेकापूर १२ , शेल्लाळी ७, शिराढोण १३, तळ्याचीवाडी १०, तेलूर ८ , उमरज ५, वहाद १२, वाखरड १२, वंजारवाडी ७, येलूर ९ आदीसह सर्व गावचे पाणी नमुने संकलित करण्यात येत आहेत. हे नमुने तपासणीस पाठवून आणि त्यानंतर योग्य की अयोग्य, याचा उलगडा होईल. शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरतो. किती पाणीनमुने अयोग्य आहेत, हे समजण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा यत्रंणेतील तांत्रिक दोष, पाणी स्त्रोत देखभाल व दुरूस्तीअभावी आदीमुळे पाणी दूषित होते. पाण्याजवळील घाण यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असतो. अशामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पाणीनमुने तपासणी करून ते पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित केले जाते.
- पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित शुद्ध पाणीपुरवठा केला केला जातो. पं. स. व तालुका आरोग्य विभागाने यासाठी समन्वयाने काम केले जात आहे. जिल्ह्यात ११ हजार २९० चे उद्दिष्ट होते. परंतु, ९ हजार २१९ फोटो अपलोड झाले. अर्धापूर १०० टक्के, उमरी १०० टक्के तर कंधार ९० .२० टक्के उद्दिष्ट साध्य झाले.
- गटविकास अधिकारी कैलास बळवंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार अधिकारी अशोक सोनकांबळे, एस.एम.अली यांच्या सूचनेनुसार पाणीनमुने गोळा केले जात आहेत.