सिमेंट बंधाऱ्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:41+5:302021-07-08T04:13:41+5:30
नांदेड : मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथे सीता नदीवर नवीन बंधारा उभारण्यात येत असून, त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी ...
नांदेड : मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथे सीता नदीवर नवीन बंधारा उभारण्यात येत असून, त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी सरपंच जलनायक बाळासाहेब देशमुख, उपसरपंच मधुकर गोवंदे, नरसिंगराव पाटील, धोंडजी पाटील, बालाजी कुसूमवाड, जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता शिंदे उपस्थित होते. या बंधाऱ्यामुळे भूजलस्तर वाढण्यास मदत होईल.
नाल्यांची साफसफाई
नांदेड : तालुक्यातील महिपाल पिंपरी येथील नाल्यांची साफसफाई करण्यात आली. नागरिकांच्या मागणीची दखल घेत ग्रामपंचायतीने गावलगत असलेले मोठे नाले तसेच गावातील नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले आहे.
रस्त्याची दुरवस्था
नांदेड, शहरातील छत्रपती चौक ते जयभवानी चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गुरुजी चाैक परिसरात खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. हा रस्ता सायकल ट्रॅकसाठी दुरुस्तीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही रस्त्याची अवस्था जैसे थे आहे.
माेकाट जनावरे रस्त्यावर
नांदेड, मालेगाव रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. गोकुळनगर परिसरात महापालिकेचा कोंडवाडा असतानाही जनावरे रस्त्याने मोकाट फिरत आहेत. याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
खड्डे बुजविले
नांदेड, शहरातील प्रमुख रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. परंतु, खड्डे बुजवित असतना खड्ड्यातील माती काढली जात नाही. त्यामुळे थुकापाॅलिश करून खड्डे बुजविण्याचे होणारे काम वेळीच थांबवून दर्जेदार काम करावे, अशी मागणी होत आहे.