पालक सचिवांनी केली पिकांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:00 AM2018-10-20T01:00:00+5:302018-10-20T01:02:29+5:30
पालकसचिव तथा राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी मुखेड तालुक्यातील सलगरा, अखरगा येथील शिवारात भेट देवून पिकांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा नियोजन भवन येथे बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांतील कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पालकसचिव तथा राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी मुखेड तालुक्यातील सलगरा, अखरगा येथील शिवारात भेट देवून पिकांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा नियोजन भवन येथे बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांतील कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
डवले यांनी मुखेड तालुक्यातील सलगरा, आखरगा शिवारात जावून पीकपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदींसह अधिकारी, पदाधिका-यांची उपस्थिती होती. सलगरा येथे ज्वारी, कापूस, तूर पिकांची पाहणी केल्यानंतर डवले यांनी शेतकºयांशीही संवाद साधून पिकांच्या नुकसानीबाबतची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आढावा बैठकीत अधिका-यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, पाटबंधारे मंडळाचे एस. बी. सब्बीनवार, नांदेड पाटबंधारे विभागाचे आर. एम. देशमुख आदींसह अधिका-यांची उपस्थिती होती.
- राष्टÑीय पेयजल कार्यक्रमातील कामांना वेग देण्याची आवश्यकता व्यक्त करीत टंचाई गावांतील कामांना प्राधान्याने पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने या अभियानातंर्गतची तसेच प्रत्येक योजनांची कामे येत्या डिसेंबरपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश देत जलयुक्त शिवार कामाचा त्यांनी आढावा घेतला. मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मनरेगा योजनांचा फायदा शेतक-यांना झाला पाहिजे यासाठी अधिकारी, कर्मचा-यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डवले यांनी केले.
नांदेड जिल्ह्यात यंदा सुमारे ७९ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली असली तरी काही तालुक्यांत अत्यल्प पाऊस झालेला आहे. या ठिकाणची पिके वाळून गेल्याने शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे.