विभागीय पथकाकडून वाळूघाटांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:29 AM2019-06-07T00:29:13+5:302019-06-07T00:30:56+5:30

जिल्ह्यात सुरू असलेल्या अमाप वाळू उपशाची विभागीय कार्यालयाने दखल घेत गुरुवारी थेट दोन पथके जिल्ह्यात पाठवत नायगाव आणि उमरी तालुक्यातील वाळू घाटांची पाहणी केली.

Inspection of sand from the departmental squad | विभागीय पथकाकडून वाळूघाटांची तपासणी

विभागीय पथकाकडून वाळूघाटांची तपासणी

Next
ठळक मुद्देवाळू माफियांना चाप परभणी, हिंगोलीच्या पथकांनी केली मेळगाव, महाटी, येंडाळा, कौडगाव घाटांची पाहणी

नांदेड/नरसीफाटा : जिल्ह्यात सुरू असलेल्या अमाप वाळू उपशाची विभागीय कार्यालयाने दखल घेत गुरुवारी थेट दोन पथके जिल्ह्यात पाठवत नायगाव आणि उमरी तालुक्यातील वाळू घाटांची पाहणी केली. अचानकपणे करण्यात आलेल्या या तपासणीमुळे वाळू माफियांसह जिल्हा महसूल विभागही हादरला आहे. विशेष म्हणजे या पथकाने गोदावरी परिसराची ड्रोन कॅमेराने छायाचित्रण केले आहे.
जिल्ह्यात जवळपास १० ते १२ वाळूघाटावर उपसा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. या ठिकाणी नियमांना डावलून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता. विशेषत: नायगाव, बिलोली आणि उमरी तालुक्यातील तक्रारी मोठ्या प्रमाणात विभागीय आयुक्तांपर्यंत पोहचल्या होत्या. या अमाप वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी सुरू होती. स्थानिक अधिकारी वाळू उपशाच्या तक्रारीकडे दूर्लक्ष करीत असल्याने अनेक तक्रारकर्त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. अखेर विभागीय आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेत गुरुवारी दोन पथके नांदेड जिल्ह्यात पाठवली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने परभणी व कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी व परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील गौणखनिज विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान थेट मेळगावच्या रेती घाटावर पोहचले. एम एच २२ डी ७२११ या क्रमांकाच्या बोलेरो गाडीतून सहा ते सात जनांचे पथक गोदावरी नदीत मेळगावच्या गोदावरी नदीत परभणीचे अधिकारी पोहचल्यानंतर त्यांनी ड्रोन कँमेºयाच्या सहाय्याने नदीतील मोठमोठ्या खड्याचे छायाचित्र व मोजमाप काढले. त्यानंतर दुपारी या रेतीघाटापासून काही अंतरावर असलेल्या त्याचबरोबर मेळगाव व सांगवी शिवारात साठवलेल्या अवैध रेतीसाठ्याचेही मोजमाप घेवून कोणाकोणाच्या गट नंबरमध्ये रेती साठवण्यात आली आहे याची माहीती घेण्याचे आदेश तलाठी व मंडळ निरीक्षकांना दिले आहेत. या पथकाने रेती घाटाची व परिसराचे अतिशय बारकाईने मोजमाप काढण्याच्या कामात दिवसभर व्यस्त होते.
या पथकाने उमरी तालुक्यातील महाटी, कौडगाव आणि येंडाळा येथील वाळूघाटांचीही पाहणी केली. येथे झालेले उत्खनन किती झाले याची मोजणी करण्यात आली आहे. या पथकाकडून मोजणीचे काम दिवसभर सुरू होते. मेळगावच्या रेती घाटातील मोजमाप काढण्यासाठी पथक गोदावरी नदीत पोहचल्यानंतर लिलाव धारक अक्षरश: हादरुन गेले असून सदर प्रकरणी काय कारवाई होते याची धास्ती घेतली आहे तर दुसरीकडे दोन दिवसापूर्वी नायगाव तहसील कार्यालयातील तिघांना मेळगाव प्रकरणी कारणे दाखवा नोटीस दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नायगाव तहसील कार्यालयही संशयाच्या भोवºयात अडकले आहे.
नायगाव तालुक्यात नियम डावलून होत असलेल्या वाळू उपशा संदर्भात तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याकडे तक्रारीचा पाऊस पडला असतांना या सर्व तक्रारींकडे त्यांनी कानाडोळा केला. तहसीलदार काहीच कारवाई करत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. तिथेही त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रेती माफियांचेच नायगाव तालुक्यात साम्राज्य अशीच परिस्थिती आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी पोहोचले रेती घाटावर
परभणी जिल्ह्यातील पथकाकडून मेळगावच्या रेती घाटाची मोजमाप व तपासणी होत असल्याची माहिती जिल्हा महसूल विभागाला मिळताच प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी यांनीही थेट मेळगावला गाठले. त्यांनी गोदावरी नदी पात्राची पाहणी केली. विभागीय आयुक्ताचे पथक आल्याची नायगाव तहसीलला माहीती मिळताच नायगाव तहसील कार्यालय हादरुन गेले. त्यानंतर तातडीने उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रभारी तहसीलदार नंदकुमार भोसीकर, नायब तहसीलदार वगवाड आदी अधिकारी मेळगावला हजर झाले. याचबरोबर धमार्बाद व बिलोलीचे उपविभागीय अधिकारी मेळगावला पोहचले होते.एकूणच या तपासणीमुळे नायगाव, उमरी, बिलोली तालुक्यातील वाळू माफिया हादरले आहेत.


विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या पथकाकडून मेळगाव, कौडगाव, येंडाळा व बिजेगाव येथे पाहणी करण्यात आली. मेळगाव येथे वाहने नव्हती. येंडाळा येथील वाहने पळून गेली तर बिजेगाव येथे काही वाहने सापडली आहेत. हे पथक नायगाव आणि उमरी तालुक्यात झालेल्या वाळू उपसा व साठ्यांचे मोजमाप काढणार आहेत.
-श्रीकांत गायकवाड, उपविभागीय अधिकारी

Web Title: Inspection of sand from the departmental squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.