लसीकरण केंद्राची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:16 AM2021-04-05T04:16:29+5:302021-04-05T04:16:29+5:30

५० हजार रुपये जमा करा नांदेड - पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करावेत, अशी ...

Inspection of vaccination center | लसीकरण केंद्राची केली पाहणी

लसीकरण केंद्राची केली पाहणी

Next

५० हजार रुपये जमा करा

नांदेड - पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी केले. तसेच कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना ५ लाख रुपये द्यावेत, असेही त्यांनी नमूद केले. या संदर्भात त्यांनी वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे.

कारागिरांची उपासमार

धर्माबाद - कोरोना व कोरोनामुळे विविध कामगारांची कामाविना उपासमार होत आहे. खोळंबलेल्या कामांमुळे दररोजचे खायचे काय असा प्रश्न अनेकांना पडला. दररोज हजार-पाचशे कमवणाऱ्या कामगारांना आज १०० रुपये मिळणेही अवघड झाले. आमच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. अशा स्थितीत कुटुंब जगवायचे असा सवाल सवाल कामगार करीत आहेत.

मजुरांना कामे मिळेनात

माहूर - लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे व्यवसाय बंद पडले आहेत. वाळू, मटका, गुटखा, जुगार यासह मोठ्या प्रमाणात अवैध व्यसाय सुरू झाले. मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. कामाअभावी मजुरांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. शासकीय अधिकारीही याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. लाेकप्रतिनिधी विविध निवडणुकीत गुंग आहेत.

निकृष्ट धान्याचे वाटप

मांडवी - सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत मार्च महिन्यात शिधापत्रिका धारकांना गहू कमी देण्यात आला. निकृष्ट दर्जाचा मका वाटप करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे राशन दुकानात शिधापत्रिकाधारक व दुकानदार यांच्यात बरेच वाद झाले. जनावरेसुद्धा खाऊ शकत नाहीत, असा मक्याचा दर्जा होता अशा तक्रारी ग्राहकांनी केल्या.

बोळसा येथे आग

उमरी - तालुक्यातील बोळसा गंगापट्टी येथे पत्र्याच्या शेडला आग लागून एका वगारीचा मृत्यू झाला. दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या. यात शेती उपयोगी अवजारे होते व बियाणे जळून खाक झाली. ३० मार्च रोजी ही घटना घडली. आगीत लाखांचे नुकसान झाले. केशव शिंदे असे आग पीडीतांचे नाव आहे. तलाठी व कोतवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

लसीकरण मोहीम

मुदखेड - मुदखेड तालुक्यात ठिकठिकाणी लसीकरण मोहीम जोरात राबविली जात आहे. तालुक्यात काही ठिकाणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही. मोहिमेबद्दल लोकांच्या मनात अजूनही भीती आहे. मोहिमेबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Web Title: Inspection of vaccination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.