होळी पेटविण्याऐवजी गावात दोन तरुणांची चिता पेटली;अपघाताने दोन कुटुंबाचा आधार हरवला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:34 PM2022-03-17T19:34:43+5:302022-03-17T19:35:18+5:30

दोन कुटुंबातील कर्ते मृत्यूमुखी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे

Instead of lighting Holi, two youths' cheeta were set on fire in the village; two families lost their livelihood in the accident | होळी पेटविण्याऐवजी गावात दोन तरुणांची चिता पेटली;अपघाताने दोन कुटुंबाचा आधार हरवला 

होळी पेटविण्याऐवजी गावात दोन तरुणांची चिता पेटली;अपघाताने दोन कुटुंबाचा आधार हरवला 

googlenewsNext

मुखेड ( नांदेड ): तालुक्यातील जांब बु.जवळ शिरुर ताजबंद रोडवर बुधवारी दुपारी टेंम्पो व बाईकची धडक होऊन दोघेजन ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. यातील दोन्हीही मयत हे जळकोट तालुक्यातील चेरा येथील रहिवासी होते. आज सणाच्या दिवशी होळी पेटविण्याऐवजी दोन तरुणांची चिता पेटविण्याची वेळ आल्याने गावावर शोककळा पसरली आहे. 

चेरा येथील परमेश्वर दिगांबर कावलवाड ( २२ ), दिगांबर राम राजगिरवाड ( ३२, दोघे राहणार चेरा ) व सुधाकर आशोक पोकलवाड ( ३०, वर्ष रा.आटकळी ता.बिलोली ) हे तिघे बुधवारी चेरा येथून जांब बु. येथे बाईकवरून (क्रमांक एम.एच.२६ ए.झेड ०२१७ ) जात होते. दरम्यान, शिरुर ताजबंद रोडवर दारुदुकानदार तेलंग यांच्या टेम्पोसोबत ( क्रमांक एम.एच.२४ ए.बी.५४२४)  बाईकची धडक झाली. यात बाईकवरील तिघेही गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दिगांबर राजगिरवाड व परमेश्वर कावलवाड यांना गंभीर दुखापत असल्यामुळे जळकोट येथे पाठवले. दिगांबरचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. तर परमेश्वरचा उदगीर येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

परमेश्वर कावलवाड याच्या पश्चात आई,वडिल,एक भाऊ ,एक बहिण असा परिवार आहे. तर दिगांबरच्या पश्चात आई, पत्नी व ३ वर्षांची एक मुलगी असा परिवार आहे. तो उसतोड कामगार म्हणून काम करतो. राशन संपल्याने गावी आला होता. राशन जमा करून होळी सणासाठी परत जाण्याच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडली.

Web Title: Instead of lighting Holi, two youths' cheeta were set on fire in the village; two families lost their livelihood in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.