पार्डी नदीला इसापूर धरणाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:54 AM2019-02-28T00:54:30+5:302019-02-28T00:55:36+5:30
सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़
पार्डी : सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़
सांगवी बंधाºयात इसापूर धरणाचे पाणी पोहोचणार आहे़ त्यानंतर काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून सदर पाणी उत्तर नांदेडला पुरविले जाणार आहे़ विष्णूपुरी धरणात ६० दिवस पुरेल इतकाच जलसाठा उरला होता़ नांदेडकराची तहान भागविण्यासाठी इसापूर धरण्याच्या पाण्याची मागणी वाढली होती़ जिल्हाधिकाऱ्यांनी इसापूर धरणातून दोन दलघमी पाण्याची मागणी केली होती़ त्याकरिता एक दलघमी पाणी सांगवी बंधाºयात सोडण्यात आले आहे़ हे पाणी निमगाव येथील मेन कॅनलद्वारे पार्डी नदीच्या पात्रात २६ फेब्रुवारी रोजी रात्री सोडण्यात आले़ हे पाणी २८ फेब्रुवारी रोजी सांगवी बंधाºयात पोहण्याची शक्यता आहे़
इसापूर धरण्याच्या पाण्यामुळे अर्धापूर तालुक्यातील पार्डी, शेणी, कामठा बु, कामठा खु़, बामणी, शेलगाव खु़, शेलगाव बु़, सुगाव, सांगवी, मेढला, निजामपूरवाडी, पिंपळगाव व अर्धापूरसह गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून दैनंदिन वापरासाठी नदी-नाल्याशेजारी ग्रामपंचायतकडून सार्वजनिक विहीर व बोअर बांधण्यात आल्या आहेत़ विहीर व बोअर उन्हाळ्यात कोरड्या पडल्या होत्या़ नळाला पाणी येत नव्हते़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते़ काही भागातील विहिरीने तळ गाठण्यास सुरुवात केली होती़ या भागातील पिके वाळण्यास सुरुवात झाली होती़ दरम्यान पार्डी गावाच्या नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याने या गावातील पिण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़