उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:55+5:302021-08-12T04:22:55+5:30
दर का वाढले... कोरोनामुळे बाजारापेठा आणखी सुरळीत सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक दुकानदारांकडून मागणी होऊन पाहिजे तेवढा पुरवठा होत ...
दर का वाढले...
कोरोनामुळे बाजारापेठा आणखी सुरळीत सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक दुकानदारांकडून मागणी होऊन पाहिजे तेवढा पुरवठा होत नाही. त्यात डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्चात वाढ झाल्याने साबुदाणासह सर्वच किराणा मालाचे दर वाढले आहेत.
साबुदाणा आरोग्याला हानिकारकच
साबुदाणा हा स्टार्च पदार्थ म्हणून ओळखला जातो. तो चावताना रबरासारखा लागतो.
साबुदाणा खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन आरोग्य बिघडते. भूक मंदावणे, मूळव्याध, बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याचे प्रमाण वाढते.
उपवास आहे, मग हे पदार्थ खा...
उपवासाच्या दिवशी २४ तास दुधावर राहिलेले उत्तम, ते जर एकेरी खाल्लं तर ते अमृत म्हणून काम करतं. ते सात्त्विक अन्न आहे. दुधाने भूक भागत नसेल तर उपवासासाठी त्या-त्या ऋतूमधील फळं, शेंगदाणे, खजूर, राजगिऱ्याचे लाडू हे खाल्लेले उत्तम; परंतु साबुदाणा टाळावा. - डॉ. रूपेश भोसले, आहार सल्लागार, नांदेड