जांबकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:40 AM2018-05-13T01:40:18+5:302018-05-13T01:40:18+5:30

मुखेड-शिरुर रोडवर व-हाडाला झालेल्या भीषण अपघाताने जांबवासियांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती़ अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शक्य त्याप्रकारे अपघातस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना मदत केली़ जांबकरांनी दाखविलेल्या या तत्परतेने माणुसकीचे दर्शन घडविले़

Jambkar made human philosophy of humanity | जांबकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

जांबकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देअपघातातील मदतीसाठी धाव : मिळेल त्या वाहनाने जखमींना पाठविले रुग्णालयात

विजय पांपटवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
जांब : मुखेड-शिरुर रोडवर व-हाडाला झालेल्या भीषण अपघाताने जांबवासियांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती़ अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शक्य त्याप्रकारे अपघातस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना मदत केली़ जांबकरांनी दाखविलेल्या या तत्परतेने माणुसकीचे दर्शन घडविले़
जांबवासियांना शनिवार हा दिवस अत्यंत कसोटीचा ठरला. एकीकडे प्रेताचा खच तर दुसरीकडे जखमींचा आक्रोश पाहून हृदय हेलावून जात होते. किंकाळ्या व रडण्याने हा परिसर शोकाकूल झाला होता. जखमींना उपचारासाठी दाखल करण्याची प्रक्रिया जलदगतीने करणे आवश्यक होते. जखमींची संख्या २८ च्यावर असल्याने या सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यासाठी जांबवासियांनी तत्परता दाखविली. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलाविण्यात आल्या. त्यानंतर रुग्णांना जवळच्या रुग्णालयात तसेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जे वाहन दिसेल त्या वाहनांनी हलविण्यात आले. यावेळी जांब येथील सूर्यकांत मोरे, मनोज गोंड, बाळासाहेब पुंडे, अण्णाराव शिंदे, श्रीकांत सूर्यवंशी, सोमनाथ फुलारी, आनंद राऊतवाड, माधव वारे, ओमकार सोनटक्के, रमेश कटाळे, संतोष कटाळे, गजानन शिंदे, युसूफ मुजावर, श्याम शिंदे, संजय येरपूरवाड, दयानंद कानगुले, शेषराव मोरे, बालाजी कोल्हे आदींनी मदतकार्यात भाग घेतला. जखमींना पाणी पाजणे तसेच त्यांना धीर देण्याचे काम जांबवासिय करीत होते. द्वारकाबाई मोरे यांनी मयताच्या अंगावर स्वत:जवळील वस्त्र पांघरले. जांब येथील सपोनि गणपत गिते अपघात झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते़

जांबच्या डॉक्टरांनी केले प्राथमिक उपचार
घटनास्थळी अपघाताची भीषणता लक्षात घेऊन जांब येथील ग्रामस्थांनी जमेल तसे जमेल त्या पद्धतीने मदतीचा हात दिला़ जि.प.सदस्य मनोज गोंड आणाराव शिंद, बाळासाहेब पुंडे, उपसरपंच बालाजी कोल्हे, दयानंद कानगुले, सोमनाथ राऊत, शिवलिंग कानगुले, श्याम शिंदे, सूर्यकांत मोरे, अनंत राऊतवाड, वैभव कानगुले, आदींसह गावकरी मंडळीनी जखमींना मदत केली़ तर ग्रामपंचायतच्या वतीने दवाखान्यात अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती़ घटनास्थळी व दवाखान्यात आ़ तुषार राठोड व देगलूर मतदारसंघाचे आ़ सुभाष साबणे, दिलीप पाटील, संतोष तिडके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपअधीक्षक किशोर कांबळे, उपजिल्हाधिकारी व्यंकट कोळी, तहसीलदार जटाळे, मंडळ अधिकारी उत्तरवार, तलाठी जी.डी.कल्याणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ विठ्ठल मेकाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ रमेश गवाले आदींनी भेट दिली़ गावातील डॉ़ तानाजी मोरे, डॉ़ संजय कोंडापुरे, डॉ़ अनंतवार डॉक़ापसे, डॉ़हासनाळे यांनी सावरगाव, वांजरवाडा, जळकोट येथील रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींवर प्राथमिक उपचार केले़ मुखेडचे पोनि़संजय चौबे, सुदर्शन सुर्वे, गणपतराव गीत्ते, गणपत केंद्रे, बळीराम घुले यांच्यासह घटनास्थळी मोठा फौजफाटा होता़

Web Title: Jambkar made human philosophy of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.