जिल्हाध्यक्षपदी जिगळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:20 AM2021-03-09T04:20:19+5:302021-03-09T04:20:19+5:30

निळू पाटील यांचा सत्कार हदगाव - तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निळू पाटील यांची सतत तिसऱ्यांदा निवड झाली. याबद्दल लिंगायत ...

Jigalekar as District President | जिल्हाध्यक्षपदी जिगळेकर

जिल्हाध्यक्षपदी जिगळेकर

Next

निळू पाटील यांचा सत्कार

हदगाव - तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निळू पाटील यांची सतत तिसऱ्यांदा निवड झाली. याबद्दल लिंगायत समाज संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष गोदरे, संदीप तुपकरी, दीपक पांगरे, मनोहर डोरले आदी उपस्थित होते.

टाळकी ज्वारीचा पेरा वाढला

किनवट - किनवट तालुक्यातील शिवणी परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी टाळकी ज्वारीचा पेरा वाढविला आहे. पावसाळी ज्वारीचे पीक परवडत नसल्याने अनेक शेतकरी उन्हाळी टाळकीकडे वळले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार अनेकांनी केली. तसेच पावसाळ्यात पिकांचे रक्षण करणेही अवघड होत आहे.

अखंड हरिनाम सप्ताह

हदगाव - प.पू.वै. सद्गुरू विठ्ठल देव महाराज बनवसकर यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त ८ ते १५ मार्चदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मान्यवरांची भजन, कीर्तने होतील. तसेच दररोज काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ आदी कार्यक्रमही होणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शरद महाराज बनवसकर यांनी केले.

रोखपाल बनसोडे सेवानिवृत्त

देगलूर - येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे रोखपाल शिवशंकर बनसोडे ५ मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात सपत्नीक निरोप देण्यात आला. यावेळी शाखाधिकारी जयंत, संतोष मांडे, सयाजी शिवाफुले, माधुरी चौधरी, भगवानराव पाटील, सौरभ बनसोडे, योगेश बनसोडे, शिल्पा जाधव, भगवान काळे आदी उपस्थित होते.

शिवमंदिर तीन दिवस बंद

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १०, ११, १२ मार्च रोजी चैतन्यनगर येथील शिवमंदिर बंद राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून शिवमंदिर समितीने हा निर्णय घेतला. रोजचे धार्मिक कार्यक्रम, पूजा, विधी व इतर कोरोनाचे नियम पाळून होत असल्याचे सांगण्यात आले.

गणवेशाचे वाटप

उमरी - सोमठाणा जि.प. शाळेतील एस.सी., एस.टी. प्रवर्गातील १८२ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक युवराज राजापुरे, सरपंच बालाजीराव पंतोजी, उपसरपंच लक्ष्मण यलमलवाड, शा.व्य.स.चे अध्यक्ष गंगाधर चिंताके, उपाध्यक्ष राहुल सोनकांबळे, माणिक वनसागरे, भाटापूरकर, देशमुख, काझी, कस्तुरे, राठोड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वनसागरे यांनी केले.

घुगे उमरीला रूजू

उमरी - येथील नायब तहसीलदार म्हणून व्ही. एस. घुगे यांनी सूत्रे स्वीकारली. यापूर्वी ते औरंगाबाद येथे कार्यरत होते. तसेच उमरीचे नायब तहसीलदार शंकर नरावाड यांची उपविभागीय अधिकारी कार्यालय बिलोली येथे बदली झाल्याने ही जागा रिक्त होती. तहसीलदार माधव बोथीकर यांनी घुगे यांचे स्वागत केले.

दिलीप पुंडे यांचा सत्कार

मुखेड - महात्मा ज्याेतिबा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक व कल्याण विभागाकडून मुखेड भूषण दिलीप पुंडे यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेत सदस्य म्हणून पुंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. बी. अडकिणे, उपप्राचार्य के. बलाराजू, प्रा. सी. बी. साखरे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. के. आहेर तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सी. एन. एकलारे यांनी केले.

कोविड लसीकरणाला सुरुवात

नांदेड - तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर उपस्थित होत्या. जि.प. सदस्य गंगाप्रसाद काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे, तुप्पाच्या सरपंच मंदाकिनी यन्नावार, तालुका आरोग्य अधिकारी निरगुटे, जिने, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी राठोड, डॉ. अमित रोडे, डॉ. सुभाष वानखेडे, डॉ. अर्चना परगुलवार, ज्येष्ठ नागरिक शेख चांद पाशा, बबन कदम उपस्थित होते.

Web Title: Jigalekar as District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.