जिजाऊ व विवेकानंद जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:44 AM2021-01-13T04:44:07+5:302021-01-13T04:44:07+5:30
अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आंदोलन सारखणी : येथील गट क्र. २०, २१, २२, ६४, ६५ व ८२ मधील ...
अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे
दाखल करण्यासाठी आंदोलन
सारखणी : येथील गट क्र. २०, २१, २२, ६४, ६५ व ८२ मधील शेतजमिनीवर गैरआदिवासींच्या नावे बोगस मालकीहक्क, नमुना नंबर ८ वर घेतलेल्या नोंदी रद्द कराव्यातल तसेच सीताराम कुडमेथे यांच्या शेतजमिनीवर झालेले अतिक्रमण हटवण्यात यावे, या मागणीसाठी सारखणी ग्रामपंचायतसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
आंदोलन सुरू होण्याअगोदर सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, काही निष्पन्न झाले नाही. ७ जानेवारी रोजी गटविकास अधिकारी धनवे यांनीही भेट देऊन चर्चा केल्यानंतर चार मागण्या सोडून अन्य दोन प्रमुख मागण्यांसाठी ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, असे यावेळी आंदोलकांनी सांगितले. आंदोलनात कॉ. शंकर सिडाम, वसंत कुडमेथे, गणपत मडावी, सीताराम डोनीकर, सरपंच वनमाला तोडसाम, सदस्य सूर्यभान सिडाम, दिनेश आडे, लक्ष्मण तोडसाम, भीमराव महाजन, गणपत जुगनाळे, रामराव सिडाम आदी सहभागी आहेत.