जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मर्यादित साजरा होणार -पुरुषोत्तम खेडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:43 AM2021-01-13T04:43:39+5:302021-01-13T04:43:39+5:30
जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दरवर्षी मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. लाखो जिजाऊप्रेमी या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी ...
जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दरवर्षी मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. लाखो जिजाऊप्रेमी या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होत असतात. यावर्षी हा उत्सव अगदी मर्यादित स्वरूपात साजरा केला जाणार आहे. मागील दहा महिन्यांपासून जिजाऊ जन्मस्थळ बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा परिसरात जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी कलम १४४ लागू केले आहे. तसेच जमावबंदी आहे. जिजाऊ सृष्टी येथे मुख्य कार्यक्रमात वीस प्रमुख पाहुणे व पदाधिकारी यांना उपस्थित राहता येईल, असे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही स्टॉल्सना उदा- जेवण, पुस्तके, साहित्य, पेय, पाणी परवानगी दिली नाही. या परिस्थितीत जिजाऊप्रेमींनी आपापल्या घरातच व गावातच शक्यतोवर कौटुंबिक पातळीवर जमेल तसा जिजाऊ जन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे. दरम्यान मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार यांनी ही जिजाऊ जन्मोत्सव आपापल्या घरी च साजरा करावा असे आवाहन केले आहे.