JNU Attack : 'हल्ल्यामागे एबीव्हीपी'; एसएफआयकडून नांदेडमध्ये निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:05 PM2020-01-07T17:05:31+5:302020-01-07T17:07:35+5:30

हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी

JNU Attack: 'ABVP Behind Attack'; Demonstrations in Nanded from SFI | JNU Attack : 'हल्ल्यामागे एबीव्हीपी'; एसएफआयकडून नांदेडमध्ये निदर्शने

JNU Attack : 'हल्ल्यामागे एबीव्हीपी'; एसएफआयकडून नांदेडमध्ये निदर्शने

Next

नांदेड : दिल्ली मध्ये झालेल्या हल्ल्याचा नांदेडमध्ये एसएफआयच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. आयटीआय चौक येथे मंगळवारी दुपारी निदर्शने करण्यात आली.

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थी संसद अध्यक्ष आयशी घोष यांच्यावर ५ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ५० ते ६० हल्लेखोरांनी विद्यापीठात घुसून अचानकपणे हल्ला केला. हा एकप्रकारे दहशतवादी हल्ला होता व तो आरएसएस प्रणित अभाविपने केला असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. तसेच हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी एसएफआय शहर कमिटीच्यावतीने करण्यात आली. 

आंदोलनात एसएफआयचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड,मीना आरसे,विकास वाठोरे,शहराध्यक्ष स्वप्निल बुक्तरे,शंकर बादावाड,रत्नदिप कांबळे,परमेश्वरी उंबरकर,संजना धुमाळे,संध्या लोकडे,प्रथम तारु,अक्षय वाघमारे,विक्की कांबळे,मनिष सावंत,अमित गजभारे,अक्षय गायकवाड, इम्रान शेख,रोहन नवघडे,किशोर बुक्तरे,शुभम रायपलवार,महेद्र इंगोले आदींचा सहभाग होता.

Web Title: JNU Attack: 'ABVP Behind Attack'; Demonstrations in Nanded from SFI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.