मानार धरण गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:54 AM2019-05-06T00:54:53+5:302019-05-06T00:55:37+5:30

बारूळ : मागील ५३ वर्षांत मानार प्रकल्पातील फक्त २ लाख ५ हजार ९१२ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले ...

just mud in Manar dam | मानार धरण गाळात

मानार धरण गाळात

googlenewsNext
ठळक मुद्देमानार प्रकल्प : मागील ५३ वर्षांत फक्त २ लाख घनमीटर गाळ काढला

बारूळ : मागील ५३ वर्षांत मानार प्रकल्पातील फक्त २ लाख ५ हजार ९१२ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रकल्पात अजूनही लाखो घनमीटरच्यावर गाळ असल्याने हा प्रकल्प गाळात रुतल्याचे चित्र आहे़
बारूळ येथील मानार प्रकल्प कै़ शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने १९६२ साली झाला़ या प्रकल्पाचा फायदा कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यांतील शेतकरी, नागरिक, जनावरांना पिण्यासाठी व सिंचनासाठी झाला़ प्रकल्पामुळे २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून त्यामुळे शेतकरी, नागरिक सधन झाले़
मानार प्रकल्पाला ५३ वर्षे झाली़ या वर्षात लाखो घनमीटरवर गाळ या प्रकल्पात आला़ पण प्रकल्पातील गाळउपसा अत्यंत कमी प्रमाणात झाला़ या प्रकल्पातील गाळ उपसा करण्यासाठी प्रशासनाला अपयश आले़ याचे कारण म्हणजे ढिसाळ नियोजऩ गाळ काढण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही़
गाळ काढण्याची सुरुवात उशिरा होणे, गाळ काढून देण्यासाठी उपाययोजना नसणे, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत अशांना शेतात मोफत गाळ टाकून देणे यासह आदी उपाययोजना प्रशासनाकडून केल्या नसल्यामुळे गाळ उपसा काढून शेतात घेवून जाण्यास शेतकऱ्यांनी थंड प्रतिसाद दिल्यामुळे हा प्रकल्प गाळात रुतला आहे़
१४६ दलघमी जलसाठ्याचा हा प्रकल्प गाळात रुतल्याने याची पाणीपातळी साठा कमी झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के गाळ उपसा केला तर दहा धरण बांधल्यासारखा साठा या प्रकल्पातील होईल़ या प्रकल्पात सध्या १४़७९ टक्के पाणीसाठा आहे़
‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या अभियानांतर्गत तहसीलकडे एकाही सेवाभावी संस्थेचा प्रस्ताव दाखल झाला नाही़ त्यामुळे सध्या प्रकल्पातील गाळ शेतकरी वैयक्तिकरित्या काढून घेवून जात असल्याची माहिती शाखा अभियंता एस़एम़ पांडागळे यांनी दिली़
मागील दोन वर्षांखाली २०१६ मध्ये प्रकल्पातील १ लाख ६७ हजार घनमीटर, २०१७- निरंक, २०१८- ३५ हजार ९१२, २०१९ सध्या चालू ५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला़
मागील २०१६ व २०१८ मध्ये मानव लोक सेवाभावी संस्थेचे मशीन व शासनाकडून डिझेल देवून गाळ उपसा काढण्यात आला होता़ यंदा मात्र एकाही सेवाभावी संस्थेने दखल न घेतल्याने शेतकरी स्वत: गाळ काढून घेवून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
१४६ दलघमी जलसाठ्याचा हा प्रकल्प गाळात रुतल्याने साठा कमी झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के गाळ उपसा केला तर दहा धरणे बांधल्यासारखा साठा या प्रकल्पातील होईल़ सध्या १४़७९ टक्के पाणीसाठा आहे़
मानार प्रकल्पाला ५३ वर्षे झाली़ या वर्षात लाखोंच्यावर गाळ या प्रकल्पात आला़ पण प्रकल्पातील गाळउपसा अत्यंत कमी प्रमाणात झाला़ या प्रकल्पातील गाळउपसा काढण्यासाठी प्रशासनाला अपयश प्राप्त झाले़ याचे कारण म्हणजे ढिसाळ नियोजऩ

Web Title: just mud in Manar dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.