काबरा व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:18 AM2021-05-19T04:18:12+5:302021-05-19T04:18:12+5:30

आ. कल्याणकर यांच्याकडून पाहणी नांदेड- नसरतपूर जोड रस्ता व अंडरग्राऊंड रेल्वे ब्रीज रस्त्याच्या दोन्ही बाजुंची अवस्था दयनीय झाली आहे. ...

Kabra Lecture Series | काबरा व्याख्यानमाला

काबरा व्याख्यानमाला

Next

आ. कल्याणकर यांच्याकडून पाहणी

नांदेड- नसरतपूर जोड रस्ता व अंडरग्राऊंड रेल्वे ब्रीज रस्त्याच्या दोन्ही बाजुंची अवस्था दयनीय झाली आहे. याची पाहणी नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर यांनी केली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करुन रस्त्याचा विषय लवकर मार्गी लावण्यास सांगितले. यावेळी सरपंच देविदासराव सरोदे, गफारखान, बालाजी भोरगे, वडवणेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

नांदेड- शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असला तरी संकट अद्याप टळलेले नाही. मंगळवारी कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नांदेड शहरातील तिघांचा समावेश आहे. जैन मंदिर येथील ६१ वर्षीय पुरुष, आनंदनगर येथील ४२ वर्षीय महिला आणि हर्षनगर येथील ७५वर्षीय पुरुषाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्वयंसेवी संस्थांना आवाहन

नांदेड- ज्या स्वयंसेवी संस्था जिल्हा अथवा तालुकास्तरावर प्रशिक्षण, संवाद, श्रमदान नियोजनात सहयोग देण्यास इच्छुक आहेत अशा संस्थांनी ३१ मे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे. ज्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत त्यांनी नव्याने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभाग (रोहयो) येथे संपर्क साधावा.

खावटी अनुदानासाठी अर्ज करा

नांदेड- आदिवासी समाजातील गरजू कुटुंबांना अर्थिक सहाय्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने खावटी अनुदान योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी पूर्वी अर्ज न भरलेल्या व अटी व निकषात पात्र असणाऱ्या आदिवासी कुटुंबांनी नवीन अर्ज भरावेत, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच. पुजार यांनी केले आहे.

ॲपद्वारे घरी बसल्या मार्गदर्शन

नांदेड- कोरोना काळात आजारी व्यक्तींना डॉक्टरांचा सल्ला मिळावा या उद्देशाने आरोग्य विभागातर्फे घरी बसल्या ॲपद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. गृहविलगीकरणात असलेले रुग्णही या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत आहेत. रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी ही सुविधा उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी कळविले आहे.

शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

नांदेड- सन २०२०-२१ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिके तसेच पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनी कीटसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीद्वारे २० मे पर्यंत अर्ज सादर करावेत. या योजनेसाठी मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

Web Title: Kabra Lecture Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.