कंधार तालुक्यात अपु-या निधीमुळे पाणंदमुक्तीला खीळ; प्रशासन शौचालयांसाठी ग्रामपंचायतीचा निधी वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:58 PM2018-01-25T15:58:24+5:302018-01-25T15:58:54+5:30

ग्रामपंचायती वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे करतात़ हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना मिळतो़ मोठ्या गावात निधी मोठा असतो़ परंतु कामाची संख्या व निधीचा ताळमेळ बसत नाही़ त्यातच लहान गावाचीही अशीच गत आहे़ निधी अल्प व कामे यात तफावत असते़

In Kandahar taluka, due to lack of funds; Administration will use Gram Panchayat funds for toilets | कंधार तालुक्यात अपु-या निधीमुळे पाणंदमुक्तीला खीळ; प्रशासन शौचालयांसाठी ग्रामपंचायतीचा निधी वापरणार

कंधार तालुक्यात अपु-या निधीमुळे पाणंदमुक्तीला खीळ; प्रशासन शौचालयांसाठी ग्रामपंचायतीचा निधी वापरणार

googlenewsNext

कंधार (नांदेड) : तालुका पाणंदमुक्तीसाठी शौचालय बांधकामे करण्याला निधीची आडकाठी आली़ त्यामुळे कामांना खीळ बसली़ अपुर्‍या निधीची कोंडी फोडण्यासाठी पाणंदमुक्तीला ग्रामपंचायत स्तरावरील निधीची मात्रा देऊन बांधकामातील अडथळा दूर करण्याचे सांगण्यात आले़ त्यातून १२ हजार ६२१ शौचालयाचे बांधकाम करून तालुका मार्च २०१८ अखेर पाणंदमुक्त होणार का? याची उत्सुकता लागली आहे़

तालुक्यात ११६ ग्रामपंचायती असून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पंचायत समितीने विविध टप्पे तयार केले़ स्वच्छतेची मोठी चळवळ निर्माण करण्यात यश आले़ ऐन दुष्काळ, सुगीच्या हंगामात शेतकरी-शेतमजुरांनी चळवळ गतिमान करण्यात सक्रिय योगदान दिले़ परंतु शौचालय बांधकाम करूनही निधीचा तुटवडा निर्माण झाला़ ५१ गावे पाणंदमुक्त झाली़ परंतु निधीअभावी उद्दिष्ट पूर्ण करण्यात मोठा गतिरोध निर्माण झाला़ दीड हजारांपेक्षा अधिक प्रस्ताव निधीची वाणवा झाल्याने रखडले़ त्यामुळे पाणंदमुक्तीचे भवितव्य अधांतरी झाले़ आणि ही चळवळ थंडावते की काय, असे चित्र निर्माण झाले़ तालुका स्तरावरून निधीची मागणी होवूनही पुरवठा मात्र होत नव्हता़ वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्नांची पराकाष्ठा होत होती़.मात्र आता निधीची कोंडी फोडण्यासाठी मार्ग काढण्यात आला आहे़ 

तालुक्यात ४० हजार ७९८ पैकी २८ हजार १७७ शौचालये बांधकाम पूर्ण झाली़ त्यात ५१ गावे पाणंदमुक्त झाली़ अद्याप ६५ गावे ही पाणंदमुक्ते करण्यासाठी १२ हजार ६२१ शौचालयाची कामे पूर्ण करावी लागतील़ त्यात आता तळ्याचीवाडी ३२, बोरी खु़ ५५, शिरसी बु़ ५९, बोळका ६०, मानसिंगवाडी ६०, संगुचीवाडी ६५, दाताळा ६७, रामानाईकतांडा ७९, उमरगा खो़-८०, पोखर्णी ८४, धर्मापुरी मजरे ८५, दैठणा-९२, आलेगाव ९८, नारनाळी ९९, काटकळंबा १०१, औराळ १०३, शिरूर १०३, रुई १०६, पांगरा ११०, बोरी बु़ ११७, कंधारेवाडी ११७, हाडोळी ब्ऱ-११८, सावरगाव (नि़)-१२८, हटक्याळ १२९, शेकापूर १३१, शेल्लाळी १३१, बिजेवाडी १३६, उमरज १४३, येलूर १४५, तेलूर १५१, बामणी १५३, पानशेवडी १५६, कोटबाजार १५८, कळका १६२, लाडका १६४, हिप्परगा (श़)-१७०, गऊळ-२४३, दिग्रस खु़-१८७, नंदनवन १८७, शिराढोण १९१, दहीकळंबा १९२, मंगलसांगवी-२१८, कौठा-२२१, बाचोटी-२२३, घागरदरा-२२८, कल्हाळी २३२, खंडगाव (ह)-२५२, गुंटूर-२६३, फुलवळ-२६९, हाळदा २८२, वहाद-२८२, आंबुलगा-२८३, चिखली-२८७, मंगनाळी ३८२, पानभोसी-३९६, कुरुळा ५३६, उस्माननगर ५९७ व पेठवडज ९३२ अशी शौचालये बांधकामे आहेत़

१४ वा वित्त आयोग, सीएसआर, नरेगा निधीचा वापर होणार
ग्रामपंचायती वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे करतात़ हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना मिळतो़ मोठ्या गावात निधी मोठा असतो़ परंतु कामाची संख्या व निधीचा ताळमेळ बसत नाही़ त्यातच लहान गावाचीही अशीच गत आहे़ निधी अल्प व कामे यात तफावत असते़. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे़ १४ वा वित्त आयोग, सीएसआर, नरेगा, स्थानिक निधी आदींचा वापर कसा केला जाणार आहे आणि तालुक्यातील ६५ ग्रामपंचायती कशा पाणंदमुक्त होणार आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ गावपातळीवरील लोकप्रतिनिधी यांचा प्रतिसाद, पं़स़चे नियोजन व पाठपुरावा यावरच तालुका पाणंदमुक्तीचे भवितव्य अवलंबून आहे़ 

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या निधीचा उपयोग शौचालय बांधकामासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत़ नरेगा, चौदावा वित्त आयोग, सीएसआर, स्थानिक निधी, लोकसहभाग आदी निधीचा वापर करण्याच्या सूचना जि़प़  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिका-यांना दिल्या आहेत.

 

Web Title: In Kandahar taluka, due to lack of funds; Administration will use Gram Panchayat funds for toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.