कंधार तालुक्यात कुपोषित बालकांचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:45 AM2018-02-26T00:45:50+5:302018-02-26T00:46:21+5:30
तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात कुपोषित बालकांची संख्या ३३७ होती़ परंतु तीन महिन्यांत वयानुसार तीव्र कमी वजनाचे बालके वरच्या श्रेणीत आणण्यात यश आले़ जानेवारीअखेर २७० बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे़ ६७ बालकांच्या वजनात सुधारणा करण्यासाठी लोकसहभागातील बालगोपाळ पंगत, आरोग्य शिबिरे, आहाराचे प्रात्यक्षिके आदीची मात्रा लागू झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़
गंगाधर तोगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात कुपोषित बालकांची संख्या ३३७ होती़ परंतु तीन महिन्यांत वयानुसार तीव्र कमी वजनाचे बालके वरच्या श्रेणीत आणण्यात यश आले़ जानेवारीअखेर २७० बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे़ ६७ बालकांच्या वजनात सुधारणा करण्यासाठी लोकसहभागातील बालगोपाळ पंगत, आरोग्य शिबिरे, आहाराचे प्रात्यक्षिके आदीची मात्रा लागू झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़
तालुक्यात १० विभागांगर्तत अंगणवाडी व मिनी अंगणवाडीची संख्या ३२० आहे़ पूर्व प्राथमिक शिक्षण आहार, आरोग्य आदी सोयी-सुविधा अंगणवाडी केंद्रातून शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पुरविल्या जातात़ यातून सक्षम व संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी केंद्राची उपयुक्तता आहे़ तरीही नानाविध पायाभूत सुविधा, शुद्ध पाणी, स्वतंत्र इमारत, स्वच्छतागृह आदीची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे़ त्यातच सकस आहार, मनोरंजनाची अत्यंत आवश्यकता आहे़ सर्वसमस्यावर मात करत कुपोषणमुक्ती करण्याचे मोठे आव्हान असते़ त्यातून सर्वसाधारण श्रेणीत बालके आणण्याचा प्रयत्न केला जातो़ आॅक्टोबर महिन्यात असलेली कुपोषित बालकांची संख्या आता जाने अखेरमध्ये कमी झाली आहे़ संपामुळेही बालकाकडे थोडे दुर्लक्ष झाले होते़
सर्वसाधारण श्रेणीत बालके आणण्याचा प्रयत्न
सर्वाधिक कुपोषित बालक संख्या उस्माननगर मध्ये आहे़ सर्वात कमी कुपोषित बालकसंख्या रुई विभागात आहे़ कुपोषणमुक्तीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास बळवंत यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी संजय मेडपलवाड, पर्यवेक्षिका एऩएच़सर्केलवाड, विजया नागरगोजे, एस़डी़सूर्य, आशा धोंडगे, भारती पाटील, उषा चव्हाण, गंगासागर नरवाडे, सी़आऱघोडजकर, युक़े़गिरी, मदतनीस कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले़
सर्वसमस्यावर मात करत कुपोषणमुक्ती करण्याचे मोठे आव्हान असते़ त्यातून सर्वसाधारण श्रेणीत बालके आणण्याचा प्रयत्न केला जातो़ आॅक्टो. महिन्यात असलेली कुपोषित बालकांची संख्या आता जानेवारी अखेरमध्ये कमी झाली आहे़ संपामुळेही बालकाकडे थोडे दुर्लक्ष झाले होते़
० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या २० हजार ९३४ अशी जाने़ महिन्यातील आहे़ त्यात वजन घेतलेले १८ हजार ६४४ बालक संख्या होती़ साधारण श्रेणीत १७ हजार १३६ होती़
वयानुसार मध्यम तीव्र वजनाचे १२३८ तर तीव्र कमी वजनाचे २७० बालके आढळली़ आॅक्टो़ २०१७ मध्ये तीव्र कमी वजनाचे ३३८ बालके होती़ त्यात आता ६७ ने घट झाली आहे़
कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़
जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील ० ते सहा वयोगटातील बालकांना दिला जाणारा पोषण आहार योग्य वेळी मिळत नसल्याने कुपोषित बालकांचे प्रमाण वाढत आहे़ त्यासाठी कुपोषित बालकांसाठी गावात बालविकास केंद्र स्थापन करण्याची गरज आहे़ याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे़