कंधार तालुका टॅंकरमुक्त करणार

By admin | Published: January 30, 2015 02:42 PM2015-01-30T14:42:28+5:302015-01-30T14:42:28+5:30

कंधार जलयुक्त शिवार अभियान तालुक्यात मोठय़ा प्रमाणात राबवण्यात येऊन तालुका टंचाईमुक्त करण्याचा निर्धार कंधार-लोहाचे आ. प्रतापराव पा. चिखलीकर यांनी केला.

Kandhar taluka will be made tanker free | कंधार तालुका टॅंकरमुक्त करणार

कंधार तालुका टॅंकरमुक्त करणार

Next

 

बारुळ : कंधार जलयुक्त शिवार अभियान तालुक्यात मोठय़ा प्रमाणात राबवण्यात येऊन तालुका टंचाईमुक्त करण्याचा निर्धार कंधार-लोहाचे आ. प्रतापराव पा. चिखलीकर यांनी केला.
सर्वांसाठी पाणीटंचाई मुक्त महाराष्ट्र २0१९ जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामाचे २0१४-२0१५ महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना वनपरीक्षेत्र अधिकारी मुखेडच्यावतीने सलग समतल चर, कंधार तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने ढाळीचे बांध, लघु सिंचनच्यावतीने साखळी बंधारा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत एच.डी.पी.ई पाईपाचे वाटप तसेच ठिबक सिंचन, योजने अंतर्गत दोन लाभार्थ्यांना पूर्व संमती देण्यात आली. अशा विविध योजनेचा प्रारंभ चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येऊन मौजे आलेगाव येथील पाण्याचा ताळेबंद डिजिटल होल्डींगचे उद््घाटन केले. 
अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अश्‍विनी पाटील तर प्रमुख पाहुणे जि. प. चे माजी सभापती प्रवीण पाटील, प्रणिता देवरे, सभापती सोनाली ढगे, जि. प. सदस्य कुशावती भिसे, कार्यकारी अभियंता माधवराव उप्पलवाड, तालुका कृषी अधिकारी गायकवाड, लागवड अधिकारी शेख, नायब तहसीलदार चव्हाण, प्रा. किशन डफडे, सुधाकर कांबळे, सरपंच घोरबांड, कदम वर्तळे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सरपंच बालाजी वर्ताळे, चेअरमन बापूराव मोरे, प्रकाश मोरे, मंडळ कृषी अधिकारी मन्नान शेख, कृषी सहाय्यक देशमुख, परमेश्‍वर मोरे, मेडपलवार, गुट्टे, किर्तेवार, मोरेगावकर यांनी परिश्रम घेतले. /(वार्ताहर)

     

Web Title: Kandhar taluka will be made tanker free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.