बीडीओच्या नोटिसीला ग्रामसेवकाने दाखविली केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:03 AM2018-10-15T01:03:23+5:302018-10-15T01:03:51+5:30
तालुक्यातील रिसनगाव येथे शौचालयगृह लाभार्थ्यांना धनादेश वाटप गैरव्यवहार, ग्रामसभा न घेणे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यास सहकार्य न करणे, चौदावा वित्त आयोग निधीची विल्हेवाट लावणे, गावात न येणे अशी लेखी तक्रार उपसरपंचासह पाच ग्रा.पं.सदस्यांनी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकाºयाने दिलेल्या अंतिम नोटिसीलाही ग्रामसेवकाने उत्तर न देता केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहा : तालुक्यातील रिसनगाव येथे शौचालयगृह लाभार्थ्यांना धनादेश वाटप गैरव्यवहार, ग्रामसभा न घेणे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यास सहकार्य न करणे, चौदावा वित्त आयोग निधीची विल्हेवाट लावणे, गावात न येणे अशी लेखी तक्रार उपसरपंचासह पाच ग्रा.पं.सदस्यांनी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकाºयाने दिलेल्या अंतिम नोटिसीलाही ग्रामसेवकाने उत्तर न देता केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे.
रिसनगावचे ग्रामसेवक व सरपंचांनी उपसरपंचासह इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता चौदावा वित्त अयोगाच्या निधीची विल्हेवाट लावली. शौचालयगृह बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यास धनादेश देणे बंधनकारक असताना शासन आदेशाला धुडकावत ज्या लाभार्थ्याकडे एकच शौचालयगृह आहे त्यांना एकापेक्षा अधिक धनादेश वाटप करण्यात आले़ तसेच ज्यांच्याकडे शौचालय नाही व प्रस्तावसुद्धा नाही अशांना पात्र लाभार्थी बनवून त्यांना लाभाचा धनादेश खिरापतीप्रमाणे वाटप केले़ परिणामी खरे पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहिले असा आरोप निवेदनाद्वारे केला आहे.
महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामपंचायत कार्यालय उघडलेच नाही. विशेष म्हणजे, रिसनगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकाºयांची भेट घेऊन गावाचा कारभाराचा पाढा वाचला असता गटविकास अधिकाºयांनी सदर ग्रामसेवकास २४ सप्टेंबर रोजी प्रथम नोटीस बजावली़ त्यास उत्तर न मिळाल्याने पुन्हा १ आक्टोबर रोजी अंतिम नोटीस पाठवली. परंतु, अद्याप ग्रामसेवकाने बीडीओंच्या नोटिसीला उत्तर दिले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली़
सदर ग्रामसेवक व सरपंचाच्या मनमानीला आळा घालावा, सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर उपसरपंच माया माधव तिगोटे, ग्रा.पं.सदस्य अमोल तिगोटे, गोदावरी पवार, कलावती एकलारे, भगवान शिंदे व पद्मिनबाई हाबगुंडे यांच्या स्वाक्षºया आहेत.