करखेलीत चौरंगी, तर आटाळा गणात तिहेरी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:10 AM2018-10-29T00:10:20+5:302018-10-29T00:12:42+5:30
बाजार समिती निवडणूकीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या करखेली व आटाळा गणात निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आटाळा गणात राष्ट्रवादीचे उमेदवार भावी सभापतीचे दावेदार असून करखेली गणात भाजपचे उमेदवार भावी सभापती दावेदार आहेत़ त्यामुळे या गणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. करखेली व आटाळा गणात दोन माजी सभापतीची प्रतिष्ठेची बनली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
धर्माबाद : बाजार समिती निवडणूकीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या करखेली व आटाळा गणात निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आटाळा गणात राष्ट्रवादीचे उमेदवार भावी सभापतीचे दावेदार असून करखेली गणात भाजपचे उमेदवार भावी सभापती दावेदार आहेत़ त्यामुळे या गणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. करखेली व आटाळा गणात दोन माजी सभापतीची प्रतिष्ठेची बनली आहे़
आटाळा गणात राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप यांच्यात तिहेरी लढत होत आहे़ तर करखेली गणात सुद्धा राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व अपक्ष अशी चौरंगी लढत होत आहे. आटाळा गण हे चौथे गण असून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जागा सुटलेली आहे. या गणात आटाळा, येल्लापूर, चोळाखा, बेलगुजरी, सायखेड ही गावे समाविष्ट असून एकूण १४९७ शेतकरी मतदार आहेत. राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती दत्ताहारी पाटील चोळाखेकर यांची पत्नी गोदावरीबाई दत्तात्रय कदम या राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. काँग्रेसचे बाजार समितीचे माजी संचालक माधव पाटील शिंदे यांची पत्नी अर्चना माधव शिंदे व भाजपाचे उमेदवार अनुसयाबाई प्रकाशराव भोसले हे रिंगणात असून तिहेरी लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार गोदावरीबाई कदम या सभापतीच्या दावेदार आहेत़
करखेली गण हे सातवे गण असून सर्वसाधारण पुरूषला जागा सुटली आहे. या गणात करखेली, मूतन्याळ हे दोन गावे असून एकूण १४७४ शेतकरी मतदार आहेत. भाजपाचे उमेदवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा म.वि प. ता. अध्यक्ष गणेशराव पाटील करखेलीकर, राष्ट्रवादीचे उमेदवार शंकरवार व्यंकटराव सायन्ना, काँग्रेसचे उमेदवार म.शफी रज्जाक मोहीयोद्दीन व अपक्ष उमेदवार कुलकर्णी अरूणा काशीनाथ हे एकमेकांचे विरूद्ध असून चौरंगी लढत होत आहे.