"काय को आ गये गाव में, घर में झोपने का ना गुपचूप"; जरांगे पाटलांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:08 PM2023-10-29T12:08:42+5:302023-10-29T12:09:06+5:30
खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या वाहनातील ताफ्यावर मराठा आंदोलनकर्त्यांनी हल्ला केल्यानंतरचे विधान
लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड: ते काय राष्ट्रपती आहेत का? काय को गये हमारे गाव में, घर में गुपचूप झोपने का ना, डोके को ताण देराय उगाचं उगं, हमने बोला ना हमारे गाव मेें आने का नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा समाचार घेतला. गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील आंबुलगा गावात चिखलीकर यांच्या वाहनातील ताफ्यावर मराठा आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला होता. यावर जरांगे पाटील यांनी वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आरक्षणासाठी ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर पुन्हा उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला पाठिंबा म्हणून राज्यभरात अनेक गावांनी आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे.
सरकारने सुपारी दी तुमको? : जरांगे पाटील
तुम्ही आमच्या काड्या लावायला येता का? सरकारने सुपारी दी तुमको कायदा व सुव्यवस्था बिगाडणे सुपारी सरकारने दी है क्या. गाव मे आने का नाही. तुम्हारी जगा कहा है, वहा विधानभवन मे. तो वहा जा के मराठा आरक्षण के बारे मे बोलने का. हमारे गाव मे हमारे दुख के उपर मीठ चोळने को आते क्या. मगर अब मराठा सज्ञान हो गया है, ये अब नही चलेगा, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी वृत्त वाहिन्यांसमाेर चिखलीकरांचा समाचार घेतला.
कार्यकर्त्यांचा संताप
गावात बंदी असलेले फलकही गावांबाहेर लावले आहेत. त्यातच गुरुवारी रात्री खासदार चिखलीकर हे आंबुलगा येथे गेले होते. यावेळी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी गावात कसे काय आले म्हणून जाब विचारला होता. तसेच त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये काळे झेंडे दाखविले.