आरटीई प्रवेश क्षमता मागील वर्षाप्रमाणेच ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:25+5:302021-03-18T04:17:25+5:30
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये ३ हजार १५८ जागेवर आरटीई नुसार प्रवेश देण्यात आले तर २०२०-२१ मध्ये ३ हजार ३२९ ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये ३ हजार १५८ जागेवर आरटीई नुसार प्रवेश देण्यात आले तर २०२०-२१ मध्ये ३ हजार ३२९ प्रवेश क्षमता होती. परंतु यावर्षी मात्र आरटीई प्रवेशावर गदा येणार असून शासनाने दिलेल्या प्रवेश क्षमतेनुसार शाळांनी फेब्रुवारी- मार्च २०२० मध्येच प्रवेश दिले आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोरोना संसर्ग वाढल्याने प्रतिबंध म्हणून शाळा बंद ठेवल्या. त्यामुळे जून- जुलै २०२० मध्ये पाल्यांच्या प्रवेशासाठी पालक शाळेकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे प्रवेश क्षमतेच्या ५ टक्के प्रवेश झाले की नाही याबाबत शंका आहे. मागील वर्षाच्या प्रवेश क्षमतेनुसार यावर्षीची प्रवेश क्षमता ठरवली जात असल्याने या वर्षी आरटीई नुसार प्रवेश मिळणार की नाही याबाबत शंका आहे. या वर्षी मागील प्रवेश क्षमतेपेक्षा १ हजार ६३२ जागा कमी झालेल्या असल्याने वंचित व दुर्बल घटकांना प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. त्यातच पाल्याचे वय ६ वर्षाच्या पुढे गेल्यास ऑनलाईन अर्ज दाखल करता येत नाही. जागा कमी असून अर्ज मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यात जी आरटीई प्रवेश क्षमता देण्यात आली होती तीच प्रवेश क्षमता कायम ठेवून त्यानुसारच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.