देऊळगाव येथे स्टेट बँकेच्या वतीने किसान दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:39+5:302020-12-26T04:14:39+5:30
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील गणेश राऊत होते, तर प्रमुख पाहुणे शेख मुर्तुजा यांची उपस्थिती होती. बँक शाखा व्यवस्थापक नरवाडे, ...
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील गणेश राऊत होते, तर प्रमुख पाहुणे शेख मुर्तुजा यांची उपस्थिती होती. बँक शाखा व्यवस्थापक नरवाडे, गोल्ड योजनेचे जोंधळे, बचत गटाच्या सविता सातपुते, शिंदे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बँक अधिकारी संजय मामडे म्हणाले की, बँकेकडे देऊळगाव येथील शेतकऱ्यांचा व्यवहार चांगला आहे. शेतकरी कर्जवसुली असो किंवा इतर कामात बँकेला सहकार्य करतात, ज्या शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ झाले त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज पाहिजे त्यांनाही देऊ, ज्या शेतकऱ्यांनी शेती विकासासाठी कर्ज घेतले आहे आणि ते थकीत आहे, अशा कर्जदारांनी केवळ मुद्दल भरावी, व्याज माफ केले जाईल. सोन्यावर अगदी कमी व्याजावर कर्ज तात्काळ दिले जाईल. शेतीचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, शेती विकासासाठी बँकेकडे खूप योजना आहेत.
योजनेचा लाभ घ्यावा
बँकांची दारे सदैव खुली आहेत, असे मत बँक अधिकारी संजय मामडे यांनी व्यक्त केले. यावेळी शेतकरी मारोती सोनवळे, बालाजी सोनवळे, अशोक पाटील, डी.एस. सोनवळे, कामाजी बंडेवार, गजानन सोनवळे, प्रल्हाद सोनवळे, नरहरी सोनकांबळे, गंगाप्रसाद सोनवळे, माधव सोनवळे, प्रकाश जोंधळे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.