कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस शुक्रवारपासून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:22+5:302021-02-17T04:23:22+5:30
सदर गाडी संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. रेल्वे प्रशासनाने ...
सदर गाडी संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
रेल्वे प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार गाडी संख्या ०१०४५ कोल्हापूर ते धनबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर शुक्रवारी म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून सकाळी ४.३५ वाजता कोल्हापूर येथून सुटेल आणि पंढरपूर ७.५५, लातूर ०१.१०, नांदेड ७.३२, नागपूर ७.००, जबलपूर ३.४०, गया ४.४० मार्गे धनबादमार्गे ८.३५ वाजता पोहोचेल.
गाडी संख्या ०१०४६ धनबाद ते कोल्हापूर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर सोमवारी २२ फेब्रुवारीपासून धनबाद येथून दर सोमवारी सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि गया -१.३५, जबलपूर ०१.०५, नागपूर-०९.५५, नांदेड १०.२०, लातूर -०४.००, पंढरपूर -०८.२२ मार्गे कोल्हापूर येथे दुपारी १२.४० वाजता पोहोचेल. या गाडीस १९ डबे असतील.
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करताना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.