कृष्णा इंटरसिटी आदिलाबादला थांबते १५ तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:07 AM2021-02-05T06:07:47+5:302021-02-05T06:07:47+5:30
आदिलाबाद-नांदेड मार्गावर किनवट रेल्वे स्टेशन हे सर्वाधिक उत्पन्न देणारे स्टेशन आहे .येथून दवाखाना, शासकीय कामांसाठी नांदेडला जाणाऱ्याची संख्या मोठी ...
आदिलाबाद-नांदेड मार्गावर किनवट रेल्वे स्टेशन हे सर्वाधिक उत्पन्न देणारे स्टेशन आहे .येथून दवाखाना, शासकीय कामांसाठी नांदेडला जाणाऱ्याची संख्या मोठी आहे कोरोना महामारीचा संसर्ग कमी होत आहे. सर्वच व्यवहार सुरळीत चालू आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने आदिलाबाद ते नांदेड ही कृष्णा इंटरसिटी सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड व रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्धव रामतीर्थकार यांनी दक्षिण मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक यांच्यासह सर्व संबंधितांकडे केली. याशिवाय आदिलाबाद पूर्णा पॅसेंजर ही गाडी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणीही होत आहे.
अबब किनवट ते नांदेडला ३९० रुपये!
- आदिलाबाद ते मुंबई या विशेष गाडीने किनवट ते नांदेड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १४५ रुपये मोजून आरक्षण मिळवून प्रवास करावा लागत आहे तर याच मार्गाने गुरुवारी धावणा-या पूर्णा- पाटणा या एक्स्प्रेस गाडीने नांदेडहून किनवटला येणाऱ्या प्रवाशांना ३९० रुपये मोजावे लागत असल्याने २४५ रुपये जास्तीची रक्कम मोजून प्रवास करावा लागत आहे. प्रवास भाड्यात एवढी तफावत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.