‘कृष्णूर’ धान्य घोटाळा प्रकरणी आरोपीच्या अर्जावर युक्तीवाद पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:47 AM2019-05-16T00:47:27+5:302019-05-16T00:48:06+5:30
धान्य घोटाळा प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर युक्तीवाद झाला असून यावर १६ मे रोजी न्यायालय आदेश करणार आहेत़
नायगाव बाजार: धान्य घोटाळा प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर युक्तीवाद झाला असून यावर १६ मे रोजी न्यायालय आदेश करणार आहेत़
धान्य घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अटक केलेले आरोपी अजयकुमार बाहेती, जयप्रकाश तापडीया, राजू पारसेवार, ललितराज खुराणा यांना नायगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती़ १४ मे रोजी त्याची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर करून तपासीक अंमलदाराने पाच दिवसाची पोलिस कोठडीची मुदत वाढून द्यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली होती़
यावर तपासीक अंमलदार, सरकार पक्षाचे वकील आणि आरोपीचे वकील यांचा युक्तीवाद झाला होता़ त्यावर न्यायालयाने पोलिस कोठडीत वाढ करून देण्याची मागणी फेटाळली होती.
आरोपींचा जामीन व्हावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला़ त्यावर न्यायालयाने तपासीक अंमलदार व सरकारी वकील यांचे म्हणणे मागितले होते़ त्यावर १५ मे रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या़ स़वहाब यांच्या न्यायालयासमोर सरकार पक्षातर्फे अॅड़ एम़आऱ वसमते, आरोपीतर्फे अॅड़ शिवाजीराव हाके, अॅड़ विजय देशमुख, अॅड़ नितीन कागणे, अॅड़नेवरकर यांनी युक्तीवाद केला़
मागणी फेटाळली
१४ मे रोजी त्याची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर करून तपासीक अंमलदाराने पाच दिवसाची पोलिस कोठडीची मुदत वाढून द्यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली होती़ मात्र ही मागणी फेटाळली होती़