विहिरीत पडून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:59 AM2019-01-13T00:59:47+5:302019-01-13T01:01:10+5:30
जिल्ह्यातील शहापूर (ता.अर्धापूर) शिवारातील सुदर्शन पवार यांच्या विहिरीत माल काढणाऱ्या क्रेनच्या टोपल्यात मजूर बसून जात होते. विहिरीच्या काठावर टोपले आदळून हुक तुटला यात चार जण गंभीर झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
नांदेड : जिल्ह्यातील शहापूर (ता.अर्धापूर) शिवारातील सुदर्शन पवार यांच्या विहिरीत माल काढणाऱ्या क्रेनच्या टोपल्यात मजूर बसून जात होते. विहिरीच्या काठावर टोपले आदळून हुक तुटला यात चार जण गंभीर झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. पैकी एकाचा उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.
अर्धापूर तालुक्यातील शहापूर येथील सुदर्शन पवार यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्याचे काम सुरु आहे. या विहिरीवर काम करणारे मजूर दिगंबर बेले (वय ३५), गजानन खैरे (वय ३६), रायभान खोले (४५) हे विहिरीतील माल काढणा-या टोपल्यात बसून विहिरीत उतरत होते. यावेळी टोपले विहिरीच्या काठावर आदळल्यामुळे टोपल्याचे हुक निसटले.
यात सर्व जण विहिरीत पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. तसेच विहिरीच्या वर क्रेनच्या जवळ उभ्या असलेल्या संगीताबाई खोले (३५) यांनाही क्रेनचा मार लागल्यामुळे त्याही गंभीर जखमी झाल्या. सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील दिगंबर बेले यांचा ११ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.