पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:17 AM2021-08-01T04:17:59+5:302021-08-01T04:17:59+5:30

यावेळी आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, जिल्हाध्यक्ष ईश्वरराव ...

Lack of funds for strengthening Panand Road will not be tolerated | पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

Next

यावेळी आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, जिल्हाध्यक्ष ईश्वरराव भोसीकर, मुक्तेश्वर धोंडगे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, कारतळाचे सरपंच संभाजी कदम पाटील, गटविकास अधिकारी बळवंत, ग्रामसेवक सुरवसे, कारतळा येथील शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी गावात पायाभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. गावातील पाणंद रस्ते पक्के झाल्यास दळणवळणाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्यास मदत होईल. याच धर्तीवर कारतळा येथील मारोती मंदिरापासून ते पुढे एक कि.मी. अंतराच्या पाणंद रस्त्याचे मातीकामाची सुरुवात करण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकासकामात कोणतीही अडचण येणार नाही, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील रस्ते विकासासोबतच पाणीपुरवठ्याच्या योजनेतही गाव स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतीने ‘जलजीवन मिशन’ या योजनेची अंमलबजावणी पहिल्या फेजमध्ये घेऊन ती पूर्ण करावी. योग्य नियोजन व आराखडा तयार करून शासनाच्या योजना गावागावात राबविण्यात याव्यात. त्यासाठी शासन सर्वतोपरीने प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात वृक्षारोपण करून मोठ्या प्रमाणात गावे हरित करण्याचा संकल्प करावा. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा आदर्श येणाऱ्या पिढीसमोर ठेवावा. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले.

Web Title: Lack of funds for strengthening Panand Road will not be tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.