चार गावांत सार्वजनिक नळयोजनांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:12 AM2019-04-27T01:12:06+5:302019-04-27T01:12:27+5:30

मांडवी : सर्कलमधील मोठ्या लोकवस्तीच्या चार गावांत सार्वजनिक नळयोजना अस्तित्वात नाही. त्यामुळे येथे तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणीटंचाईवर मात ...

Lack of public water supply scheme in four villages | चार गावांत सार्वजनिक नळयोजनांचा अभाव

चार गावांत सार्वजनिक नळयोजनांचा अभाव

googlenewsNext

मांडवी : सर्कलमधील मोठ्या लोकवस्तीच्या चार गावांत सार्वजनिक नळयोजना अस्तित्वात नाही. त्यामुळे येथे तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चार ठिकाणाहून विहीर अधिग्रहण प्रस्ताव गेले आहेत़ काही गावांत सौरऊर्जेवर जोडलेला पाणीपुरवठा हा देखभाल, दुरूस्तीविना ऐन उन्हाळ्यात बंद पडला असून दोन हंडे पाणी मिळविण्यासाठी लोकांना रात्रीचे जागरण करावे लागत आहे.
आंबाडी घाटाखालचा भाग असलेल्या मांडवी परिसरात नेहमीच पाणीटंचाई आहे़ अर्धा उन्हाळा संपत आला असून अजूनही मोठ्या लोक -वस्तीच्या नागापूर, कोठारी (सिंद), लिंगी, जरुर येथे सार्वजनिक नळ योजना नाही. या गावाला पाण्याची समस्या बारमाही कटकट बनली. सध्या विहिरीने तळ गाठला. शेजारच्या पाच-सहा घरांत एक हातपंप त्याला वीज मोटार बसवून प्रतिमहिना २०० रुपये देऊन पाणी घेण्याचा प्रकार चालू आहे. काही ठिकाणी शेतकरी बैल-बंडीला बंब जोडून शेत शिवारातून पाणी आणून आपली सोय करुन घेत आहे. मजूरवर्ग दोन हंडे पाणी मिळविण्यासाठी रात्रीचे जागरण करीत आहे.
तीव्र पाणीटंचाईवर मात म्हणून उमरी (बा) दरसावंगी, पिंपळगाव, लिंगी तांडा इत्यादी ठिकाणाहून विहीर अधिग्रहण प्रस्ताव पं. स. कडे पाठविण्यात आले. सुरूवातीला सौर ऊर्जावरील पाणीपुरवठा हा एक चांगला पर्याय ठरला होता, कालांतराने या संयत्राची देखभाल आणि दुरूस्ती याकडे दुर्लक्ष झाले. ऐन उन्हाळ्यात सौरऊर्जेचा पाणीपुरवठा हा बंद आहे.
मांडवी, निराळा, कोठारी, रायपूरतांडा आदी ठिकाणी असलेले उपकरणे आता शोभेच्या वस्तू ठरत आहे़ जेथे मुबलक पाणी आहे तेथे तांत्रिक यंत्रणा ठप्प आहे. जेथे दुरूस्तीला वाव आहे तेथे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली. लग्नाच्या मांडवात शुद्ध आणि थंड पाणी मिळते, पण गावात दोन हंडे मिळविण्यासाठी गोरगरीब नागरिकांना चांगली कसरत करावी लागते आहे. नाल्यालगत असलेल्या आमच्या गावात सरकारी नळयोजना नाही. येथे जवळपास -३० मालकीचे खाजगी बोअर आहे. पैसे देऊन पाणी विकत घेणे आणि आपली गुजराण करणे सध्या चालू आहे, असे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बजरंग रेड्डी सिंगडवार यांनी सांगितले. नागापूर येथे पाणीटंचाईवर मात म्हणून लोकवर्गणीतून शंभर पाईप जोडून एका शेतातून पाणी आणून गावात देण्याचा प्रयत्न चालू आहे अशी माहिती उपसरपंच मनोज सल्लावार यांनी दिली. प्रस्तुत दोन्ही गावांत सार्वजनिक नळयोजना नाही. दरम्यान, या भागातील नागरिकांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे़
अंबाडीघाटाच्या खालच्या भागात पाणीटंचाई
आंबाडी घाटाखालचा भाग हा मांडवीचा परिसर.इकडे नेहमी पाणीटंचाई चालूच असते. अर्धा उन्हाळा संपत आला असूनही मोठ्या लोकवस्तीच्या नागापूर, कोठारी (सिंद), लिंगी, जरुर येथे सार्वजनिक नळयोजना नाही. प्रस्तुत गावाला पाणीसमस्या बारमाही कटकट बनली. सध्या विहिरीने तळ गाठला. शेजारच्या पाच-सहा घरांत एक हातपंप असून त्याला वीजमोटार बसवून प्रतिमहा-२०० रुपये देऊन पाणी घेणे, असा प्रकार चालू आहे. काही शेतकरी बैल-बंडीला बंब जोडून शेतशिवारातून पाणी घेतात. मांडवी, निराळा, कोठारी, रायपूरतांडा आदी ठिकाणी असलेले उपकरणे आता शोभेच्या वस्तू, ऐन उन्हाळ्यात सौरऊर्जेचा पाणीपुरवठा बंद आहे.

Web Title: Lack of public water supply scheme in four villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.