तलाव ओसंडू लागले, मत्स्यबीज वाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:10+5:302021-09-10T04:25:10+5:30
पावसाच्या ढगफुटीमुळे ६ व ७ रोजी दोन दिवसांत २२० मिलिमीटर पाऊस पडला होता, तसेच लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा ...
पावसाच्या ढगफुटीमुळे ६ व ७ रोजी दोन दिवसांत २२० मिलिमीटर पाऊस पडला होता, तसेच लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा प्रवाह मानार जलाशयात मोठा येत असल्यामुळे बारूळ मनार प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून मोठ्या हजारो क्युसेकने मन्याड नदीत जात आहे. या तलावांमध्ये मत्स्य व्यवसाय कानी मत्स्यबीज सोडले होते, तलाव भरून वाहू लागल्याने तलावात सोडलेले छोटे-छोटे तसेच मोठे मत्स्यबीज वाहून गेले आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रकल्पातील मासे राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. या प्रकल्पातील तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे व्यावसायिकांनी सध्या मत्स्य व्यवसाय करणे थांबले होते; परंतु आता पावसामुळे मत्स्यबीजसह या तलावात टाकलेले जाळी ओठी टाकलेले वाहून गेल्याने या व्यवसायाचा वर नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने भोई समाजाला अनुदान द्यावे, अशी मागणी सरपंच बालाजी डुबुकवाड यांनी केले.