सिडकोत भरदिवसा राेख ४ लाखांसह ५० तोळे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:22 AM2021-08-27T04:22:41+5:302021-08-27T04:22:41+5:30
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक ...
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले, उपनिरीक्षक आनंद बिचेवार आदींनी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. परिसरात नाकाबंदी करीत चोरट्यांचा शोध सुरू केला. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून ताब्यात घेतलेला एकजण दाचावार यांचा चुलत भाऊ आहे.
चौकट -
मास्टर माईंड चुलत भाऊच असण्याची शक्यता
सिडकोतील या जबरी चोरीच्या घटनेतील मास्टर माईंड हा गोविंदराज दाचावार यांचा चुलत भाऊ श्रीनिवास दिलीपराव दाचावार (वय २५) हाच असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो चोरी झालेल्या घराच्या तळमजल्यावर राहतो. गोविंदराज दाचावार हे दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांच्या घरी कुणीही पुरुष नसल्याची माहिती त्यानेच दिल्याचा पोलिसांना संशय आहे.